लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आमदारकीसाठी निवडणूक होण्याचे चित्र आहे.. त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. पण कोर्टाच्या कचाट्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अडकल्या असल्यामुळे त्या निवडणुकांशिवाय विधान परिषदेची आमदारकीची निवडणूक कठीण आहे. जळगाव महानगरपालिका नगर परिषदेच्या सदस्यांमधून ही निवडणूक होणार असल्याचे समजते. या एका जागेसाठी सत्ता सत्ताधारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महायुतीमध्ये यात फार मोठी चुरस निर्माण झाली आहे. एका जागेसाठी सत्ताधारी महायुतीमध्ये सर्वाधिक पसंतीने नाव घेतले जाणते ते भाजपच्या महिला विभागाच्या सरचिटणीस केतकी पाटील यांचे. त्यानंतर महायुतीचे नाव घेतले जाते ते पाचोरा येथील अमोल शिंदे, त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचे तर चौथे नाव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांची. या चौघांच्या नावांमध्ये चुरस असली तरी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याआधी नंदू आडवाणी यांचे नाव आघाडीवर होते. पण या निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे नंदू अडवाणी यांचे नाव आपोआप मागे पडले आहे. आणि आता चुरस महायुतीतील उमेदवारांमधील निर्माण झाली आहे. विरोधकांमध्ये अद्याप कुठल्याही उमेदवाराची चर्चा नाही. विरोधक कोणाला उमेदवारी देणार हे अद्याप ठरले नाही. परंतु महायुतीतील उमेदवारांमध्ये त्यातल्या त्यात भाजप प्रणित महायुतीच्या उमेदवाराला आमदारकीची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. यासाठी जे चार उमेदवार रिंगणात आहेत. त्यात के के पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. तितकी पाटील यांचे काम भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून जोरदार आहे. भाजपच्या कार्यक्रमात त्या आघाडीवर असतात. कोणत्याही कार्यक्रमात त्या सहभागी होतात. त्यानंतर पाचोरा येथील अमोल शिंदे यांचे नाव आहे. अमोल शिंदे हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते मागील दोन विधानसभेच्या निवडणुका अपक्ष म्हणून लढले होते. परंतु दोन्ही वेळा पक्षाविरुद्ध बंडखोरी केली होती. परंतु तेथील त्या बंडखोरीला भाजपचा अंतर्गत पाठिंबा होता. पहिल्या निवडणुकीत शिंदे अत्यंत कमी मताने पराभूत झाले होते आणि दुसऱ्या वेळी म्हणजे मागील निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने ते पराभूत झाले होते. एकंदरीत पक्षाविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या अमोल शिंदेंना उमेदवारी मिळण्यास मोठी अडचण जाणार आहे. त्यानंतर नंदकिशोर महाजन हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहिलेले आहेत. पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांचे महायुतीच्या वतीने उमेदवार म्हणून नाव समोर आले आहे. अशा प्रकारे महायुतीच्या उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. असे असले तरी आज तरी केतकी पाटील यांचे पारडे जड असल्याचे दिसते.
एकंदरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमधून आमदार किती लॉटरी कोणाला लागते? हे आता ठरणार आहे. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमदार पटेल हे नऊ वर्षांपूर्वी निवडून आले होते. त्यावेळी निवडणूक होण्याचे ठरले असताना ऐनवेळी एडवोकेट विजय पाटील यांनी आपली उमेदवारी अपक्ष म्हणून जाहीर केली. त्यामुळे पटेल यांची निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी ती निवडणूक झाली आणि या निवडणुकीत पटेल हे प्रचंड मतांनी निवडून आले आणि विजय पाटील हे पराभूत झाले. त्यानंतर तब्बल नऊ वर्षानंतर ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होते आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक होण्याआधी नंदू अडवाणी यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले होते त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली देखील सुरू झाल्या होत्या पण आता ऐनवेळी हे नाव मागे पडले आहे. आता त्या नावाची चर्चा सुद्धा होत नाही. आता जी आहे ती फक्त महायुतीच्या उमेदवारांमध्येच चुरस आहे. तीन उमेदवार भाजप प्रणित महायुतीचे आहेत. तर एक उमेदवार शिवसेना प्रणित महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील आहेत. त्यामुळे स्पर्धा जी आहे ती महायुतीच्या उमेदवारांमध्येच आहे. आता पहावे लागणार आहे की शिक्कामोर्तब कोणाच्या उमेदवारावर होतो? एकंदरीत जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यातच हा सामना होणार आहे. आता भाजप श्रेष्ठी काय निर्णय घेतात ते पाहण्यासारखे आहे. अचानक शिवसेनेचे उमेदवार प्रताप पाटील यांचे नाव पुढे आले आहे. आतापर्यंत त्यांचे नाव या शर्यतीत नव्हते, परंतु आता अचानक त्यांचे नाव पुढे आल्याने थोडी चुरस निर्माण झाली आहे. काही झाले तरी भाजप प्रणित महायुतीच्या उमेदवारांमध्येच हा सामना होणार आहे. त्यात केतकी पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. केतकी पाटील भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून तन-मन-धनाने काम करत आहेत. सतत कार्यमग्न कार्यकर्त्या म्हणून त्यांचे नाव आघाडीवर आहे. पाहूया काय होते ते..!


