Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»शिवरे येथील ग्रामसेवकाच्या मृत्यूस जबाबदार कोण?
    संपादकीय

    शिवरे येथील ग्रामसेवकाच्या मृत्यूस जबाबदार कोण?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 19, 2026No Comments286 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    पाचोरा तालुक्यातील शिवरे येथे सोमवार, दिनांक १७ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत सभा सुरू असताना तसेच ग्रामसेवक प्रल्हाद पाटील हे सभेत शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्रामस्थ आणि ग्रामसेवक यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. वादावादी सुरू असताना जुन्या बिलाच्या वादावरून ही शाब्दिक चकमक आक्रमक झाली. त्यानंतर या सभेला हिंसक वळण लागले आणि ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्या अंगावर धावून जाणे, तसेच त्यातून त्यांना मारहाण करण्यापर्यंत ग्रामस्थांची मजल गेली.

    सभेला जास्तच हिंसक वळण लागल्याने ग्रामसेवक प्रल्हाद पाटील सभेतून निघून जाऊ लागले. ते सभेतून जात असताना त्यांचा पाठलाग करून सात जण त्यांच्या मागे गेले आणि त्यांना मारहाण केली. प्रल्हाद पाटील हे घाबरून गेले. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सभा समाप्त झाली. पण या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या सभेला हिंसक वळण लागल्याने आणि त्यातूनच प्रल्हाद पाटील यांचा मृत्यू होईल, असे कुणालाच वाटले नव्हते. परंतु सभेतून निघून जात असताना त्यांचा पाठलाग करणारे हे सात जण कोण होते, की ज्यांनी प्रल्हाद पाटील यांना मारहाण केल्याने त्यांचा घाबरून मृत्यू झाला?

    सभा कितीही अटीतटीची अथवा वादग्रस्त ठरली असली, तरी त्यांचा जीव जाईल असे कृत्य करणे हे अशोभनीय आहे. ग्रामसेवकाला काही मर्यादा असतात. त्या मर्यादेत राहूनच त्याला काम करावे लागते. तेव्हा आमचे जुने बिल निघालेच पाहिजे, ते का निघत नाही, असा अट्टाहास करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे सभेला जमलेले ग्रामस्थ या मारहाणीचा निषेध करत असून, ते आपला संताप व्यक्त करीत आहेत. मारहाण करणाऱ्या त्या सात जणांनी वचपा काढण्याचा असा अशोभनीय प्रयत्न केला. एकटा ग्रामसेवक पाहून या सात जणांना फार जोर चढला आणि त्याला चोपून काढले. लोकशाहीमध्ये ग्रामस्थांनी केलेली ही शुद्ध दडपशाही आहे. सामंजस्याने मार्ग काढता येणे शक्य असताना कायदा हातात घेण्याचे काही कारणच नव्हते.

    एक तर ग्रामसेवक हा सरकारचा एकमेव प्रतिनिधी असताना त्याच्या मागे कोणीही नाही, हे माहीत असताना त्या एकट्याला गाठून या सात जणांनी जे कृत्य केले, ते भ्याडपणाचे आहे. एकंदरीत, एकट्या ग्रामसेवकाला पकडून त्याच्यावर प्रहार करणे, त्यात कसले शौर्य? हा तर निव्वळ भ्याडपणा आहे. त्या एकट्या ग्रामसेवकाचा जीव घेऊन शिवरे ग्रामसभेने काय साध्य केले? एक तर सभा पूर्ण झाली नाही. त्या सभेला आधीच्या जुन्या बिलाचा वाद काढून हिंसक वळण देणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. ते सात जण मारहाण करणारे जर जबाबदार आहेतच, पण त्याचबरोबर सभेला जमलेले ग्रामस्थही त्याला तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे पोलिसांनी प्रथमदर्शनी सात जणांवर कारवाई करावी; पण संपूर्ण ग्रामसभेतील ग्रामस्थांची काय भूमिका होती, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

    यापुढे आता कुठलीही ग्रामसभा घ्यायची असेल, तर तेथे त्या सभेला पोलीस संरक्षण देणे गरजेचे आहे. आज एक ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचा मृत्यू झाला. त्यामुळे असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस संरक्षणात ग्रामसभा पार पाडली पाहिजे. प्रल्हाद पाटील ग्रामसेवक यांच्या कुटुंबावर जे अरिष्ट ओढवले आहे, त्याला जबाबदार कोण? कानाकोपऱ्यातील विचार करणाऱ्या बिचाऱ्या प्रल्हाद पाटील यांचा जीव गेला. आज त्यांचे संपूर्ण कुटुंब पोरके झाले. त्यांच्या मृत्यूनंतर ग्रामसेवक संघटनेच्या वतीने पारोळा तालुका बीडीओ यांच्याकडे निवेदन देऊन या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    पोलीस खात्याने याचा तपास बारकाईने करून जे जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करून अटक करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली आहे. त्याचबरोबर प्रल्हाद पाटील हे शासकीय कर्तव्य बजावत असताना मृत पावले आहेत. म्हणून शासनातर्फे त्यांना एक प्रकारची आर्थिक मदत जाहीर करावी, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावता येईल, अशीही मागणी करण्यात आली आहे. शिवरे ग्रामस्थांनीही काहीतरी अद्दल घडवली पाहिजे. एका छोट्याशा कारणावरून त्याला अशा प्रकारे हिंसक वळण दिल्याबद्दल त्या ग्रामस्थांनाही धडा शिकवला पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या अशा सभेत घटना घडणार नाहीत. सात पैकी एका संशयितास अटक करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. बाकी सहा जणांचा शोध घेऊन त्यांच्यावरही अटकेची कारवाई करावी. हे सर्व पारदर्शकपणे झाले पाहिजे. कुणाचीही वशिलेबाजी येथे चालणार नाही. वशिलेबाजीने मारेकरी सुटता कामा नये, ही या निमित्ताने मागणी करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!

    September 6, 2026

    अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!

    September 3, 2026

    महामार्ग कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif