एकनाथ शिंदेंसोबत ‘या’ फोटोत कोण कोण आहे?

0

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावणारे आणि गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडली आहे. सुरतमध्ये असलेले सर्व आमदार रातोरात स्पेशल चार्टर विमानाने आसाम राज्यातील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. शिंदे हे आज पहाटेच्या सुमारास गुवहाटी विमानतळावर एकूण ४० आमदारांसोबत पोहोचले आहेत. यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे आहेत तर सात अपक्ष आमदार आहेत.
अपक्षांमध्ये प्रहार संघटनेचे बच्चू कडू हेदेखील असून त्यांच्यासह इतर अपक्षही यामध्ये सहभागी आहेत. महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार असा विश्वास बच्चू कडू यापूर्वी अनेकवेळा व्यक्त केला होता. मात्र, आता तेच बंडखोर आमदारांमध्ये सहभागी झाले असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हे  सेनेचे बंडखोर आमदार : १) महेंद्र थोरवे (कर्जत), २) भरत गोगावले (महाड). ३) महेंद्र दळवी (अलिबाग). ४) अनिल बाबर (खानापूर)
५) महेश शिंदे (कोरेगाव), ६) शहाजी पाटील (सांगोळा), ७) शंभूराज देसाई (पाटण), ८) बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर), ९) ज्ञानराजे चौघुले (उमरगा), १०) रमेश बोरणारे (विजापूर), ११) तानाजी सावंत (परांडा), १२) संदिपान भुमरे (पैठण), १३) अब्दुल सत्तार (सिल्लोड), १४) नितीन देशमुख (अकोला), १५) प्रकाश सुर्वे (मागाठणे)
१६) किशोर पाटील (जळगाव), १७) सुहास कांदे (नांदगाव), १८) संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम)
१९) प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद मध्य), २०) संजय रायुलकर (मेहकर), २१) संजय गायकवाड (बुलढाणा)
२२) एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी), २३) विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम), २४) राजकुमार पटेल (मेळघाट)
२५) शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), २६) श्रीनिवास वनगा (पालघर), २७) प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवाडा)
२८) प्रकाश अबिटकर (राधानगरी), २९) चिमणराव पाटील (एरंडोल), ३०) नरेंद्र बोंडेकर (भंडारदरा)
३१) लता सोनावणे (चोपडा), ३२) यामिनी जाधव (भायखळा), ३३) बालाजी किनीकर (अंबरनाथ)

Leave A Reply

Your email address will not be published.