१ लाखाची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास पकडले रंगेहात

0
64

चाळीसगाव | येथील मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात १ लाख रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या करवाईमुळे पोलीस प्रशासनात एक खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार यांच्याविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात २९ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशिट लवकरात लवकर पाठवून गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जनन्नाथ ढिकले (वय-३२) रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड, मेहुणबारे ता. चाळीसगाव यांनी ४ लाख ५० हजाराची मागणी केली होती. तडजोडी अंती १ लाख रूपये देण्याचे ठरविले होते. दरम्यान, तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार खात्री करण्यासाठी लाचलुचपत विभागाने गुरूवार २ जून रोजी सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक गणेश ढिकले याने १ लाख रूपयांची रक्कम घेतांना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ शैला धनगर, पोना मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ या पथकाने कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here