Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»चोपलं तेव्हा तुमच्यातील शिवसैनिक कुठे गेला होता?
    महाराष्ट्र

    चोपलं तेव्हा तुमच्यातील शिवसैनिक कुठे गेला होता?

    विधीमंडळाच्या पायऱ्यांवर कातडे पांघरलेल्या वाघांची मांजरे, बोके
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 24, 2026No Comments233 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    साताऱ्यातील प्रकरणावरून खासदाराने जोरदार टीका केली आहे. मोठे विधान करत म्हटले की, मला वाटते की, या राज्यातील सत्तेतील मित्र पक्ष आहेत, ते जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत. साताऱ्यात जे घडले ते गुंडगिरी आणि झुंडगिरी होती. चोपलं तेव्हा तुमच्यातील शिवसैनिक कुठे गेला असाही मोठा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

    पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, भाजपाच्या मंत्र्यांनी तुम्हाला रस्त्यावर चोपलं. यादरम्यानच संजय राऊत भोंदुबाबा खरात यांच्या प्रकरणावरही बोलताना दिसले. राऊतांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, खरात प्रकरणात मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावे पुढे आली पाहिजेत. भोंदू खरात प्रकरणात अजूनही बऱ्याच खऱ्या गोष्टी बाहेर येणे बाकी असल्याचे म्हणत राऊतांनी थेटपणे मोठे संकेत दिले आहेत. राऊतांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली.

    संजय राऊत यांनी म्हटले की, जे लोकशाहीचा खून झाला म्हणतात त्यांचेच हात लोकशाहीच्या खूनाने रंगले आहेत. काल विधीमंडळाच्या पायऱ्यांवर एका विशिष्ट गटाचे आमदार आणि नेते समजले होते आणि लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीचा खून झाला असे सांगत होते. त्यामधील काही मंत्र्यांना मी पाहिले, ज्यावेळी ते पक्ष सोडून गेले शिवसेना तेंव्हा ते वाघांचे कातडे पांघरलेले हे वाघ गर्जना करत होते.

    स्वाभिमानासाठी, हिंहुत्वासाठी आम्ही कसा पक्ष सोडला आणि काल विधीमंडळाच्या पायऱ्यांवर या वाघांची म्हणजे कातडे पांघरलेल्या वाघांची काल मांजरे आणि बोके झाली होती. सरकारच्या मंत्र्यांची अवस्था का? भाजपाच्या मंत्र्यांनी तुम्हाला साताऱ्याच्या रस्त्यावर चोपलंय. कुठे गेला तुमच्यातला शिवसैनिक? कुठे गेला तुमच्यातील बाळासाहेबांनी घडवलेला मर्द मावळा?

    पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, मार खाल्ला तुम्ही.. तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्ला तुम्ही.. आणि तुम्ही विधीमंडळाच्या पायऱ्यांवरती छापी पिटत आहात? शेवटी तुम्ही जे कर्म केले त्या कर्माचे हे फळ आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातील झुंडशाह होऊच शकत नाही. पोलिसांनी ज्याप्रकारे तिकडच्या पालकमंत्र्यांना चोप दिला तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला पाय मोडला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Ashok Kharat Legislature Sanjay Raut Satara Shiv Sena (Thackeray Group) Shiv Sena Shinde Group
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif