Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सत्र थांबणार कधी?
    अपघात

    नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सत्र थांबणार कधी?

    आज पुन्हा हादरली जमीन : नाशिककर चिंतेत
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 19, 2026No Comments253 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाने नाशिक जिल्हा हादरला आहे. येथील पेठ तालुक्यात भूकंपाचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अचानक जमीन हादरल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. पण सलग बसणाऱ्या धक्क्यांमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजता नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य हादरे नोंदवले गेले. ६ गावांची जमीन हादरल्याची माहिती आहे. गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन आणि एकदरे या ग्रामीण परिसरात भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले.

    घरात भांडी आणि वस्तू हलल्याचे जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर सुरक्षित ठिकाणी धावले. काही वेळ परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्हा भूकंपाने सारखा हादरत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे होतोय? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. सतत बसणाऱ्या या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे. भूगर्भशास्त्र तज्ज्ञांमार्फत या भूकंपाच्या कारणांचा आणि केंद्रांचा अभ्यास केला जात आहे.

    पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण आणि त्र्यंबकेश्वर या आदिवासी व डोंगरी भागात गेल्या ३ ते ४ आठवड्यांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. जुलैच्या अखेरपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत या भागात १० पेक्षा जास्त लहान-मोठे धक्के बसल्याची नोंद झाली आहे.

    या धक्क्यांची तीव्रता ३.२ ते ४.३ रिश्टर स्केलदरम्यान राहिली आहे. काही दिवसांपूर्वी दिंडोरीतील भनवड परिसरात सर्वाधिक ४.३ रिश्टर स्केलचा धक्का बसला होता. पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमधील गावांना यापूर्वीही वारंवार भूकंपाचे हादरे बसले असून, काही भागांतील घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif