Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पुण्यात हत्यासत्र कधी थांबणार? : २४ तासात दुसरा खून
    गुन्हे वार्ता

    पुण्यात हत्यासत्र कधी थांबणार? : २४ तासात दुसरा खून

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 2, 2024No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. कोयते हल्ले सातत्याचे झाले आहेत, पुण्यात पोलिसांची दहशतच राहिलेली नाही. पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ अन् कायम गजबलेला परिसर असलेल्या नाना पेठेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. त्या घटनेतून सावरत नाही तोच काही तासांचा आता दुसरी हत्या झाल्याने भीती पसरली आहे.

     

    पुण्यात फायनस कंपनीत मॅनेजर म्हणून असलेल्या व्यक्तीची शतपावालीसाठी निघाले असताना हत्या झाली. वासुदेव कुलकर्णी असे या त्या व्यक्तीचे नाव आहे. ही पुण्यात २४ तासाच्या आत पुन्हा दुसरी हत्या आहे. पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या गाडीतळावर मध्यरात्री फायनस मॅनेजरची हत्या करण्यात आली. चाळीस वर्षीय वासुदेव कुलकर्णी घरासमोर शतपावली करत होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचे निधन झाले होते. वासुदेव कुलकर्णी हे पुण्यातील एक प्रतिष्ठित फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

     

    पुण्यातील या दुसऱ्या हत्येनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. परंतु अद्याप कोणाला अटक केलेली नाही. वासुदेव कुलकर्णी यांच्या खुनाचे कारण अजून समोर आले नाही. पोलिसांनी हल्लेखोराच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे.

     

    माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करण्याचा कट नियोजनपूर्वक गुन्हेगारांनी रचला. आधी त्या परिसरातील लाईट बंद करण्यात आली. त्यानंतर दुचाकीवर आलेल्या तीन ते चार जणांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. वनराज आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना तिथून हल्लेखोरांनी पळ काढला. या दहशतीमधून पुणेकर सावरत नाही तोपर्यंत हडपसर परिसरात दुसरी हत्या झाली.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #murder pune
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र

    November 9, 2026

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif