गुडन्यूज.. WhatsApp Status ची वाढवली लिमिट !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

व्हॉट्सॲप पाहिल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होतच नाही. या व्हॉट्सॲपवर अनेक नवनवीन फिचर येत असतात. त्यातच आता  व्हॉट्सॲप स्टेट्सवर तुम्हाला मोठा व्हिडीओ पोस्ट करता येणार आहे.

आतापर्यंत व्हॉट्सॲप स्टेटसवर केवळ ६० सेकंदांचा व्हिडीओ टाकता येत होता. त्यामुळे आवडता व्हिडीओ कितीही सुंदर असला, तरी त्याचे तुकडे करावेच लागत होते. पण व्हॉट्सॲपचा हा नवीन अपडेट आल्यानंतर, तुम्ही थेट ९० सेकंदांपर्यंतचा व्हिडीओ एकाच वेळेस अपलोड करू शकणार आहात.

व्हॉट्सॲपने हे फीचर अजून सर्वांसाठी ओपन केलेलं नाही. सध्या हे फक्त Android यूजर्ससाठी Beta Version मध्ये टेस्टिंगसाठी उपलब्ध आहे. जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की हे फीचर तुमच्यामोबाईलमध्ये सुरू झालं आहे का, तर अगदी सोपी पद्धत आहे, व्हॉट्सॲप स्टेटस मध्ये जाऊन एखादा ९० सेकंदाचा व्हिडीओ सिलेक्ट करा. जर तो तुकड्यांमध्ये न कापता पूर्ण अपलोड होत असेल, तर समजा, तुमचं अ‍ॅप आधीच अपडेट झालंय. बीटा टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर हे फीचर लवकरच सर्व युजर्ससाठी Roll Out होईल, अशी शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.