Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»काय करावे या चोरट्यांचे? डोकं चक्रावणारी चोरी!
    गुन्हे वार्ता

    काय करावे या चोरट्यांचे? डोकं चक्रावणारी चोरी!

    तब्बल 19.60 लाखांचा मोबाइल टॉवर सेट लंपास
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 22, 2026No Comments366 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग परिसरात मोठी चोरीची घटना उघडकीस आली आहे. जिओ कंपनीचा तब्बल १९ लाख ६० हजार रुपये किमतीचा मोबाइल टॉवर सेट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    ही घटना आरग येथील शेतकरी देवदास माने यांच्या शेतजमिनीत रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या टॉवरवर घडली. ६ मे ते ११ मे या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधून संपूर्ण टॉवर सेट उचलून नेल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या आणि वजनदार उपकरणाची चोरी झाल्याने हा प्रकार नियोजनबद्ध टोळीचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

    या प्रकरणी विशाल प्रभाकर चव्हाण यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

    पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या चोरीसाठी मोठ्या वाहनाचा वापर करण्यात आला असण्याची शक्यता आहे. त्या दिशेनेही तपास सुरू असून वाहनांच्या हालचालींची माहिती गोळा केली जात आहे. दरम्यान, ग्रामीण भागात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना लवकर अटक करून मुद्देमाल हस्तगत करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif