महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला प्रचंड यश आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. देवेंद्र फडणवीस यांची नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 39 जणांचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात भाजपच्या 19 शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यात जळगाव जिल्ह्यातील विद्यमान मंत्री असलेले अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांचे नेते अजित पवार यांनी अनिल भाईदास पाटील यांना विचारले अनिल भाईदास पाटील तुमचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाहीत चालेल ना! त्यावर अनिल भाईदास पाटील यांनी तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य राहील असे त्यांना सांगितले. मंत्रिमंडळात शेवटच्या क्षणापर्यंत यादीत आपले नाव असताना आपले यादीतून नाव वगळले कसे अशा प्रकारची भावना अनिल भाईदास पाटलांनी व्यक्त करून त्यांचे चेहऱ्यावर नाराजीचा सूर दिसला. तेव्हा अजित पवार अनिल भाईदास पाटील यांना म्हणाले मंत्रिमंडळात जरी तुमचा समावेश झाला नसला तरी तुम्हाला काहीतरी चांगले पद देऊ असा दिलासा दिला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधानसभेचे उपाध्यक्षपद आहे ते उपाध्यक्षपद अनिल भाईदास पाटलांना मिळेल असे अनिल भाईदास पाटलांच्या समर्थकांच्या मनात आहे. विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळावे तर मंत्र्यापेक्षा मोठे पद असेल असे समर्थक कार्यकर्त्यांचा चर्चा सुरू झाली; परंतु शेवटी अजितदादा पवारांच्या मनात नेमकं काय आहे, हे कळायला मार्ग नाही. अनिल भाईदास पाटील यांचे मनात एका प्रकारची धाकधूक निर्माण होणे साहजिक आहे. तसेच पक्ष संघटनेची एखादी जबाबदारी सोपवली जावे काय असे एक ना अनेक अनिल भाईदास पाटलांनी व्यक्त केले जाऊन लागले आहे. मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे विषयी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जसे जसे तर्कवितर्क सुरू आहेत तसेच तर्क वितर्क जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधील अडलेल्या प्रवेशासंदर्भात अजित पवार नेमकं कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव देवकर हे गुलाबराव पाटलांच्या विरोधात झालेल्या दारून पराभवानंतर गुलाबराव देवकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय जाहीर केला. आमदारकीच्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय देवकरांनी जाहीर करून ते स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि अनिल भाईदास पाटील यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी सकारात्मकही दर्शविल्याचे कळते. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून देवकरांच्या प्रवेशाला विरोध दर्शविला. गुलाबराव देवकारांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊ नये अशी भूमिका व्यक्त केली त्यामुळे गुलाबराव देवकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश रेंगाळलेला आहे. याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अद्याप काहीच जाहीर केलेले नाही त्यासंदर्भात त्यांनी अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे कळते.
मंत्री अनिल भाईदास पाटील आणि गुलाबराव देवकर हे दोन्ही नेते जळगाव जिल्ह्यात मातब्बर नेते आहेत. या दोघांच्या संदर्भात अजित पवार कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे, असे असले तरी नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर अजित पवार हे अनिल भाईदास पाटील आणि गुलाबराव देवकर यांचे संदर्भात योग्य निर्णय घेतील असे सूत्रांच्या माहितीवरून कळते. अनिल भाईदास पाटील यांनी मंत्री असताना चांगले कार्य केले आहे. पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून त्यांची कामगिरी योग्य अशीच होती म्हणून अजितदादा अनिल भाईदास पाटलांना एखादी न सोळा त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद सोपविण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही किंवा तत्सम महत्त्वाचे पद देण्याची शक्यता आहे म्हणून आता ज्या वावड्या अनिल भाईदास पाटलांविषयी उठले आहेत. त्यावर आपोआप पडदा पडणार आहे, राहता राहिला गुलाबराव देवकरांचा राष्ट्रवादी प्रवेशाची त्या संदर्भात सुद्धा अधिवेशन ना संपल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊन गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याची शक्यता आहे. गुलाबराव देवकर हे एकेकाळी अजित पवारांचे खास समर्थक म्हणून ओळखले जात होते, अजित पवारांचा सुद्धा त्यांचेवर विशेष प्रेम आहे; त्यामुळे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात मजबूत करायचा असेल तर गुलाबराव देवकरांना पक्षात प्रवेश देणे आवश्यक आहे. हिवाळी अधिवेशनानंतर जिल्ह्यात एक मोठा कार्यक्रम घेऊन गुलाबराव देवकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होईल. त्यावेळी गुलाबराव देवकरांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांचे पितळ उघडे पडणार आहे एवढे मात्र निश्चित!
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post