Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»जळगावच्या पोलिसांना झाले तरी काय ?
    संपादकीय

    जळगावच्या पोलिसांना झाले तरी काय ?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 1, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर मागे विधानसभा अधिवेशनात आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर पोलीस खात्यातील प्रशासनात सुधारणा झाली असे वाटले होते. तथापि प्रशासक प्रशासनात सुधारणा होण्याऐवजी खुद्द गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे एका महिलेच्या फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. चक्क आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रकार उघडकीस आणला आहे. तसेच कथित घटनेची इत्यंभूत माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. एलसीबी खात्याचा प्रमुख पोलीस निरीक्षक हे पद अत्यंत जोखमीचे आणि जबाबदारीचे असते. वास्तविक पोलीस खात्यातील सर्वच पदे महत्त्वाची असतात. रक्षणकर्ता पोलीस जर भक्षक बनला असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणाचे काय? त्यांनी संरक्षण मागावे कुणाकडे? हा प्रश्न उपस्थित होतो. मागे एका पोलीस निरीक्षकाने मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी वादग्रस्त वक्तव्य करून अधिष्ठ ओढवून घेतले. जनतेच्या रेट्यामुळे अखेर त्या पोलीस निरीक्षकाची उचल बांगडी झाली. त्यामुळे पोलीस प्रशासन आपली ड्युटी बजावण्याऐवजी जर राजकारण करायला लागले तर जनता ते सहन करणार नाही. त्याला तातडीने सेवेतून मुक्त करण्यात आले.

    एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एका महिलेला लग्नाचे खोटे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पुराव्यानिशी उघडकीस आणले. परंतु पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी त्या महिलेला धमकी दिली. माझ्याविरुद्ध फिर्याद दिली तर तुला मी गोळ्या घालून ठार मारेल. एवढ्यावरच हा पोलीस निरीक्षक थांबला नाही, तर माझे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत. पालकमंत्री माझ्या खिशातले आहेत. इतर मंत्री माझे काही वाकडे करू शकत नाहीत. एसपी, डीआयजी आदींना मी घाबरत नाही, हे वाक्य एका एलसीबीच्या पोलीस निरीक्षकाचे आहे. हा पोलीस निरीक्षक विकृत मनोवृत्तीचा आहे काय? त्याची मनोवृत्ती विकृत असेल तर त्याला एलसीबी सारखे महत्त्वाचे पद दिलेच कसे? अहो पोलीस निरीक्षक एवढ्यावरच थांबला नाही. आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रकरण उघडकीस आणले तर त्यांना सुद्धा गोळी मारून ठार करेन, अशा शब्दात धमकी देतो याचा अर्थ हा पोलीस खात्यातील पोलीस निरीक्षक आहे की, गुंड टोळीचा प्रमुख आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे.

    असहाय महिलेचा फायदा घेऊन तिच्याशी लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्या असाहाय्यतेचा फायदा घेणे हे एका पोलीस निरीक्षकाला अशोभनीय आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी नियोजन मंडळ मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली, तेव्हा त्या महिलेमार्फत एमआयडीसीत गुन्हा नोंद करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. तसेच सदर पोलीस निरीक्षक यांचे वर प्रशासकीय कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बाब एका दृष्टीने चांगली असली तरी असे का होते? याचा अभ्यास केला तर वारेमा पैसा त्यांच्याकडे अवैध मार्गाने आल्यामुळे आपल्या शान शौकीसाठी अशा प्रकारे वापर होतो. पोलीस अधिकारी असलेल्या अश्विनी बिंद्रेचे काय झाले? संबंधित वरिष्ठ अधिकारी तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून बायको प्रमाणे तिचा पूर्ण वापर केला गेला आणि प्रत्यक्ष लग्न करायचा अश्विनी बिंद्रेने तगादा लावला तेव्हा संबंधित आरोपी पोलीस अधिकाऱ्याने तिचा खून केला. तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून समुद्रात फेकून दिले. अखेर हे प्रकरण उघडकीस आले. आरोपी जेलची सजा भोगतो आहे. बिचारी अश्विनी बिंद्रे मात्र जीवानिशी गेली, त्याचे काय? म्हणून जळगाव जिल्ह्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तातडीने योग्य कारवाई होऊन ते जनतेसमोर आले पाहिजे..!

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!

    October 14, 2026

    खडसे-चंद्रकांत पाटील वाद आता खालच्या पातळीवर!

    October 13, 2026

    दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif