Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»ऐकावे ते नवल! आला आंधळ्या प्रेमाचा प्रत्यय!
    राष्ट्रीय

    ऐकावे ते नवल! आला आंधळ्या प्रेमाचा प्रत्यय!

    चक्क महिला जेलरने केले कैद्याशी लग्न
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 8, 2026No Comments1,195 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मध्य प्रदेशातील सतना येथे महिला जेलरने तुरुंगातील कैद्याशी प्रेम करून लग्न केल्याची अनोखी घटना समोर आली आहे. धर्माच्या सीमा ओलांडून झालेल्या या विवाहात बजरंग दलाने कन्यादान केल्यामुळे ही प्रेमकहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

    प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, याचा प्रत्यय देणारी एक अनोखी घटना मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून समोर आली आहे. एका महिला जेलरने चक्क तुरुंगातील कैद्याच्या प्रेमात पडून त्याच्याशी विवाह केला आहे. समाज आणि धर्माच्या भिंती ओलांडून झालेला हा विवाह सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

    सतना येथील मध्यवर्ती कारागृहात फिरोजा खातून या जेलर म्हणून कार्यरत होत्या. याच कारागृहात धर्मेंद्र सिंह नावाचा तरुण एका प्रकरणात शिक्षा भोगत होता. ड्यूटीदरम्यान फिरोजा आणि धर्मेंद्र यांची ओळख झाली. सुरुवातील झालेली ही ओळख मैत्रीत बदलली आणि कालांतराने त्याचे रूपांतर प्रेमात झाले.

    दरम्यान धर्मेंद्र सिंह याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. फिरोजा खातून या मुस्लिम समुदायातील आहेत, तर धर्मेंद्र सिंह हा हिंदू आहे. या विवाहासाठी फिरोजा यांच्या कुटुंबियांकडून प्रचंड विरोध करण्यात आला. मात्र आपल्या प्रेमावर ठाम राहून फिरोजा यांनी धर्माच्या सीमा ओलांडून धर्मेंद्रसोबत आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले

    September 9, 2026

    गोंधळ करणाऱ्यांना हटकल्याने संगीतकाराची हत्या

    September 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif