Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भाविकांचे स्वागत
    जळगाव जिल्हा

    नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भाविकांचे स्वागत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 6, 2026Updated:March 6, 2026No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारतीय संस्कृतीत नद्यांना देवता मानतात. नद्यांबद्दल पूज्य भावना, कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याची आपली पुरातन परंपरा आहे. यासाठी असंख्य प्रथा, चालीरीती, रितीरिवाज आहेत. त्यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण व पृथ्वीतलावरील एकमेवाद्वितीय परंपरा म्हणजे नर्मदापरिक्रमा होय.

    याच परंपरेला मनवेल येथील चंपालाल गोकुळ पाटील या यांनी नर्मदा मैय्याची पाचवी परिक्रमा दि. ११ जानेवारी रोजी शुभमुहूर्तावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्यप्रदेश येथून संकल्प करून ४८ दिवस यात्रेत पायी चालत माता नर्मदेची पायी परिक्रमा दि. १ मार्च २०२६ रोजी पूर्ण केली.

    अत्यंत खडतर समजली जाणारी पायी नर्मदा परिक्रमा मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड राज्यांतून जवळपास बाविस जिल्ह्यामधून साधारणत साडेतीन हजार किमीचा पायी प्रवास करतांना शूलपानी, लक्कडकोट, चव्यनं, अमरकंठ, सातपुडाचे मोठे मोठे घनदाट जंगल, शेकडो पर्वतांना वळसा, रोज नर्मदा मातेची पूजा, संध्यावंदन, नित्यपाठ सतत ‘नर्मदे हर’ नावाचा जप व नामस्मरण करत पाठीवर आठ ते दहा किलो वजनाची दैनंदिन वापरातील साहित्याची बॅग घेत वयाच्या ५८ व्या वर्षी ही नर्मदा पायी परिक्रमा थंडीत, पावसात, ना शारीरिक थकवा, ना गुडघेदुखी, ना टाचेचे दुखणे, ना तळपायावर फोड याप्रमाणे पूर्ण केली ती केवळ त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीनेच!

    दि. ५ मार्च २०२६ रोजी परिक्रमा पूर्ण करून मनवेल गावातील येथील श्री मानकेश्वर महादेव, महर्षि वाल्मिक ऋषि, छत्ररपती शिवाजी महाराज, विठ्ठल रुक्मिणी मांदिरात व धुनीवाले दादाजी दरबारात जलपुजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    #maharashtra Chhattisgarh Gujarat Madhya Pradesh Narmada Parikrama Narmada River Tradition Walking Parikrama
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026

    जिल्ह्यात १६१० रुग्णांना १३.३३ कोटीची वैद्यकीय मदत

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.