जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) थंडीचा कडाका (Cold Wave) वाढला आहे. यामुळे हवामान खात्यानं (Department of Meteorology) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून आणखी पुढील दोन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), चंदीगड (Chandigarh), दिल्ली (Delhi), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या राज्यांना रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. राज्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा आहे. पुणे (Pune), अहमदनगर (Ahmednagar), औरंगाबाद (Aurangabad), जळगाव (Jalgaon) काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे.