Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»राज्यात अवकाळी पावसाचा इशारा
    हवामान

    राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 19, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असला तरी राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत आहे. आता काही भागांत आता थेट पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

    हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमधील काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसंच चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

    राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण, गोवा याठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील आठवड्यात उकाडा वाढणार असल्याचं म्हटलं गेलंय.

    प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत किमान तापमानाचा पारा 24 ते 26 अंशापर्यंत जाऊ शकतो. तर कमाल तापमानाचा पारा 34 ते 36 अंशापर्यंत असेल. या कालावधीत आकाश निरभ्र असू शकेल. त्यामुळे कोरडे वारे आणि उन्हाच्या झळा यांचा ताप होऊ शकतो.

    पुढील पाच दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस आणि गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळ आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दिवसाचं तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने कमी होण्याची अपेक्षा आहे.

    मध्य महाराष्ट्रात खानदेशपासून कोल्हापूर आणि सोलापूरपर्यंत 10 जिल्ह्यांमध्ये 18 मार्च ते 20 मार्चदरम्यान ढगाळ हवामान असेल. त्याचसोबत याठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 18 ते 21 मार्चदरम्यान आठ जिल्ह्यांवर परिणाम होऊ शकतो. तर विदर्भातही 21 आणि 22 मार्च रोजी अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये वातावरण उष्ण राहण्याची शक्यता आहे.

    Weather Update
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका

    August 10, 2026

    जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पावसाची नोंद

    August 5, 2026

    सोमवारसाठी हवामान विभागाचा धक्कादायक इशारा!

    August 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif