राज्यात अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात ऋतूंचा जांगडगुत्ता सुरु आहे. काही भागात उन्हाचा चटका तर काही ठिकाणी पाऊस. राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3, 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अशी माहिती माहिती हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

असे असेल राज्यातील हवामान

राज्यातील रत्नागिरी, हिंगोली ,नांदेड मुंबई आणि जवळपासच्या भागात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या नागपूर शाखेने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 23 आणि 24 रोजी विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे तर दिनांक 25 आणि 26 रोजी बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ ,वर्धा, अमरावती या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

तसेच पुढील २४ तासांत तामिळनाडू, केरळ, कर्नाटकचा काही भाग, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस पडू शकतो. 23 आणि 24 मार्च रोजी जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादच्या काही भागात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.