महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

0

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर भारतात पाऊस, बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारपासून राज्यातही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या औरंगाबाद, नागपूर, पुण्याचे तापमान घसरत आहे. आज सोमवारी औरंगाबादचे तापमान 10.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. विदर्भातही थंडी कमी-जास्त होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवार आणि गुरुवारी उत्तर भारतात चक्रवाताची शक्यता आहे. या काळात जोरदार बर्फवृष्टी आणि पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आजही औरंगाबादचे तापमान घसरल्याचे दिसले. विदर्भासह मराठवाडा आणि पुण्यात पारा घसरत आहे.

आजचे तापमान असे

आज सोमवारी औरंगाबादचे तापमान 10.4 नोंदवले गेले. नांदेड 13.6, सातारा 14, सोलापूर 16.7, जळगाव 10.3, नाशिक 12.5, पुणे 11.5, सांगली 16.9, उदगीर 16, रत्नागिरी 18.5, कोल्हापूर 18.3, मालेगाव 14.2, माथेरान 17.4, उस्मानाबाद 17, परभणी 12.5, ठाणे 21, डहाणू 16.1 आणि बारामती 12.9 नोंदवले गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.