Saturday, January 28, 2023

भारतात थंडीचा जोर कायम

- Advertisement -

दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात (North India) थंडीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहारसह संपूर्ण उत्तर भारतात नागरिकांन प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. रात्रीचे तापमान तेथे 3.2 सेल्सिअसपर्यंत घसरले होते. मागच्या दोन दिवसांत कानपुरातील दोन सरकारी रुग्णालयांत हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यावरून थंडीत कडाक्याची तीव्रता वाढल्याचे जाणवते.

उत्तर प्रदेशातील सर्वच जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात डार्क येलो अलर्ट (Dark Yellow Alert) जारी आहे. तर युपीची राजधानी लखनौमध्ये अती थंडीच्या परिणामामुळे शाळेला सुट्ट्या जाहीर केल्या आहे. उत्तर प्रदेशातील फरिदाबाद येथील तरुणाला (संजय, वय 23, रा. एटा) मेडिकल काऊंटरवरच हृदयविकाराचा झटका आला. थंडीमुळे ही घटना घडल्याचे मानले जात आहे. दिल्लीतही काही भागात किमान तापमान 1.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. दिल्लीत सरासरी 3 अंश तापमान आहे. रविवारपर्यंत थंडीचा तडाका कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील पाच दिवस लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून (From Meteorological Department) सांगण्यात आले. सरासरी 3 अंश तापमान दिल्लीत आहे. दिल्लीतील वातावरणात असणारे प्रदुषण (Pollution) काही प्रमाणात कमी झाले आहे.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे