Monday, August 15, 2022

उकाड्यापासून दिलासा ! राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत पावसाची शक्यता

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा कडाखा कायम आहे. काल राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आले होते. यातच राज्यामध्ये उष्णतेची लाट असताना पुढील ४ ते ५ दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

येत्या ४-५ दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाटाबरोबरच जोरदार वारे आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि कोकणात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा चढतच आहे. सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला आणि मालेगाव व चंद्रपूर या ठिकाणी आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे.

विदर्भात गडचिरोली वगळता अकोला, अमरावती, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, बहुतांशी भागात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. दिल्लीपासून ते उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, केरळ आणि काही राज्यामध्ये उष्णतेने थैमान घातले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशसह हिमाचल आणि झारखंडमध्ये पुढील २४ तासामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मते, एप्रिल महिन्यात कडक उन्हाचा अंदाज वर्तवला जात आहे. IMD ने तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. दिल्लीमध्ये आज कमाल तापमान ३९ आणि किमान तापमान १९ अंशांवर नोंदवले जाऊ शकते. यामुळे राजधानीमध्ये सुद्दा उन्हाच्या चांगल्याच झळा लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास होत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या