राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पावसाळा पोषक वातावरण असून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुण्याचा पारा ११ अंशावर

शनिवारी किमान तापमानातही घट झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड जिल्ह्यात शनिवारी नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, तापमानाचा पारा ११.३ अंशांवर घसरला आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वातावरणातील या बदलाची रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.