जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार

मकर संक्रांत गेली तरी लाडक्या बहिणी ताटकळतच..

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्वरित पैसे देण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र अद्याप लाडक्या बहि‍णींना २१०० रुपयांचा वाढीव हफ्ता मिळालेला नाही. आता या लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता कधी मिळणार याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मकर संक्रातीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्याप जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याचा कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्यासाठी महिलांना वाट पाहावी लागणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील हफ्तासाठी वाट पाहावी लागणार आहे. लाडक्या बहिणींच्या रकमेचा निर्णय कधी होणार याकडे बहिणींचं लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जुलै ते डिसेंबर असे ६ महिन्यांचे पैसे जमा झाले आहे. यातील प्रत्येक महिन्याला 1500 असे मिळून एकत्रित 9 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यभरातील सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजेनचा लाभ घेतला आहे. मात्र आता जानेवारी महिन्याचे 15 दिवस उलटले तरी या महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नहाी. हे पैसे कधी मिळणार याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार ? असा सवाल अनेक महिलांनी विचारण्यास सुरूवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.