Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»चंद्रावर जाण्याचा मार्ग आम्ही शोधू, तुम्ही शाळेपर्यंत रस्ता द्या!
    ताज्या बातम्या

    चंद्रावर जाण्याचा मार्ग आम्ही शोधू, तुम्ही शाळेपर्यंत रस्ता द्या!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 12, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जव्हार : पालघर जिल्ह्यात हजारो कोटींचे वाढवण बंदर, अगदी बंदुकीच्या वेगाने धावणारी प्रस्तावित बुलेट ट्रेन, मुंबई बडोदरा रस्ता असे अनेक डोळे दिपवणारे प्रकल्प एकीकडे होत असताना आता मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या ठाकूरवाडी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना निरगुडवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याची गंभीर बाब समोर येत असून किमान एक किमीच्या आसपास असलेला या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अक्षरश: पाण्यातून, चिखलातून येथील विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. ‘आम्ही शाळा शिकून चंद्रावर, मंगळावरही जाऊ, पण शिक्षण घेण्यासाठी शाळेपर्यंत रस्ता तरी द्या’, अशी भावनिक साद येथील विद्यार्थ्यांनी सरकारला घातली आहे.
    ठाकूरवाडी येथील तब्बल 15 ते 20 विद्यार्थी हे निरगुडवाडी येथील प्राथमिक शाळेत दररोज चालत जातात किमान एक ते दीड किमी अंतर असेल यामुळे याठिकाणी बससेवा सुरू असल्याचा संबंध नाही. याशिवाय जिथे चालायला रस्ता नाही तिथे बस जाईल तर कशी, यामुळे मग आपले दप्तर पाठीशी घेऊन विद्यार्थी दररोज ये-जा करतात. मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि चिखल होतो. यामुळे ही वाट तुडवत या विद्यार्थ्यांना दररोज जावे लागते. याशिवाय रस्त्यावर पाणी असल्यामुळे भिंतीवरून जाण्याची वेळ येथील विद्यार्थ्यांवर येते. उडी मारत असताना एक विद्यार्थी पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

    ‘‘पावसाळ्यात या रस्त्यामुळे आम्हाला काम सोडून दररोज मुलांसोबत शाळेत जावे लागते. रस्ता चांगला केला तर एखादी गाडी किंवा मुले चालतही कोणत्याही अडचणीशिवाय जाऊ शकतील. मात्र अशीच स्थिती राहिली तर आम्ही पावसाळाभर मुलांना शाळेत पाठविणार नाही. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. अन्यथा बांधकाम विभागाच्या कार्यालयात शाळा भरवली जाईल.
    – कैलास बुरुंगे, ग्रामस्थ, ठाकूरवाडी

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif