Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    • रस्त्यावर मृत अर्भक आढळल्याने जळगावात खळबळ
    • ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»आम्ही घरात बसून पोस्ट लिहित नाही, रस्त्यावर उतरून काम करतो
    राजकारण

    आम्ही घरात बसून पोस्ट लिहित नाही, रस्त्यावर उतरून काम करतो

    एका वक्तव्याने मनसैनिक भडकले : मुंबईत संघर्ष पेटला
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 5, 2026No Comments224 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबईत पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुंबईतील विविध भागात पावसाचं पाणी साचलं आहे. मुंबईकरांचं मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसादरम्यान भाजप नेते ग्राऊंडवर उतरल्याचे पाहायला मिळाले होते. रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आम्ही घरात बसून पोस्ट लिहित नसून रस्त्यावर उतरून काम करतो, असं म्हणत अमित साटम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होता. त्यानंतर अमित साटम आणि मनसैनिकांमधील संघर्ष अधिक पेटला आहे.

    काही दिवसांपूर्वी अमित साटम यांचा विधीमंडळ परिसरातील दुर्घटनेवर हसण्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अमित साटम आणि भाजपवर तीव्र शब्दात टीका केली होती. त्यानंतर अमित साटम यांनी मी दोन्ही पक्षांचं मलिद्याचे राजकारण संपवल्याची टीका केली होती. अमित साटम यांनी केलेली टीका मनसेच्या जिव्हारी लागली. त्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांनीही अमित साटम यांच्या कडक शब्दात समाचार घेतल होता.

    तुम्ही फिल्डवर आल्यानंतरही अपघात का झाले? असा सवाल करत देशपांडे यांनी अमित साटम यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मनसैनिकांनी भाजपते मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना भांडुपमध्ये काळे झेंडे दाखवले. त्याचबरोबर त्यांच्या बॅनरला देखील काळे फासले. अमित साटम यांच्या निषेधार्थ अनेक मनसैनिक डीएव्ही कॉलेजच्या बाहेर आंदोलन करत होते.

    अमित साटम म्हणाले होते की, ‘विरोधक वक्तव्याचा विपर्यास करत असून लक्ष भरकटवत आहेत. खरंतर आम्ही घरात बसून पोस्ट लिहित नाही, तर रस्त्यावर उतरून काम करत आहे. विधानसभेत आवाज उठवला. 2 दिवसांत 7 मनपा अधिकाऱ्यांचं निलंबन केलं. तुम्ही पावसात कधी उद्धव, आदित्य किंवा राज ठाकरे यांना मुंबईच्या रस्त्यावर पाहिले का? मला टार्गेट करण्याचं एकच कारणा आहे. पालिकेतील स्टँडिंग कमिटीतलं २५ वर्षांचं ‘अंडरस्टँडिंग’ (भ्रष्टाचार) आणि मलिदा आम्ही कायमचा बंद केलाय’.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif