Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    राजकारण

    पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…

    तुम्ही तुमच्या हिशोबाने तारीख आणि वेळ द्या. जंतर-मंतर आमचं..
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 12, 2026No Comments149 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके तसचं प्रवक्ते सौरव दास, आशुतोष रांका यांना काल जामीन मंजूर झाला. पण त्यात काही अटी-शर्ती आहेत. त्या आधारावर हा जामीन मंजूर झालाय. आज सौरव दास आणि आशुतोष रांका पोलीस स्टेशनमध्ये आले होते. जंतर-मंतरवर आंदोलनाची परवानगी मिळावी या मागणीसाठी ते आले होते. बाहेर मीडियाशी संवाद साधताना सीजेपीने मोठी घोषणा केली आहे.

    “ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तो पर्यंत शांततेत आंदोलन चालू राहिल” असं सीजेपीने म्हटलं आहे. “हे लोकांच्या अधिकाराचं उल्लंघन होत आहे. दिल्ली पोलीस क्रूरपणे वागतायत. बेकायदेशीर आदेश त्यांना दिले जात आहेत. स्वतंत्र पत्रकार, वकिल यांच्याशी क्रूर वर्तन केलं जात आहे” असा आरोप सौरव दास यांनी केला. ‘पोलीस प्रशासनाला ही गोष्ट समजली पाहिजे’ असं ते म्हणाले.

    “आंदोलन करणं हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. जंतर-मंतरवर आंदोलनाला परवानगी द्या असं सांगतोय. संपूर्ण दिल्लीत ते गोंधळ घालतायत” असं सौरव दास म्हणाले. “पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर आम्ही परवानगी मागतोय. तुम्ही तुमच्या हिशोबाने तारीख आणि वेळ द्या. जंतर-मंतर आमचं आहे, तिथे परवानगी मिळाली पाहिजे” असं सौरव दास म्हणाले.

    दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सौरव दास आणि आशुतोष रांका हे पार्लमेंट पोलीस ठाण्यात आंदोलनाची परवानगी घेण्यासाठी आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलय.अधिकृत परवानगी मिळवण्याच्या दृष्टीने सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी पोलिसांशी चर्चा केली. दिल्ली पोलिसांनी सांगितलेलं की, जंतर-मंतरवर अशी अचानक आंदोलनाला परवानगी मिळत नाही. त्यासाठी 10 दिवस आधी परवानगी घ्यावी लागते. म्हणून ते आले होते.

    दुसरीकडे मुंबईत दादर शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनाप्रकरणी यशवंत किल्लेदार, नितीन सरदेसाई, आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मनसे आणि ठाकरेंच्या काही नेत्यांवर देखील गुन्हे दाखल झाले आहेत. काल झालेल्या आंदोलनावरून शिवाजी पार्क पोलिसांनी कारवाई केली. सरकारी कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झालेत. सरकारी कामात अडथळा आणल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल झालेत. विनापरवानगी जमाव जमवणे, परवानगी नसताना आंदोलन करणे असे गुन्हे दाखल झालेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ

    November 8, 2026

    हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif