वावडदा, लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा – जळगाव प्रवासी ने आण करणारी लक्झरी बस वावडदे गावाजवळील वळणावर जळगाव कडून पाचोऱ्याच्या दिशेने येणाऱ्या डंपर (क्रमांक एम एच 19 सी एक्स 25 77) व लक्झरी बस (क्रमांक एम एच 19 वाय 3359) या बसची जोरदार आमने-सामने धडक झाली. सदर घटना आज दि. 1 गुरुवार रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा – जळगाव रोडवरील पाचोरा रोड हॉटेल प्रधान जवळच सुरेश विक्रम पाटील यांच्या शेताजवळ नागमोडी वळण आहे. वावडदेकडून जाणारी एल एच पाटील कन्स्ट्रक्शनची डंपर क्रमांक एम एच 19 सी एक्स 25 77 व पाचोरा कडून येणारी लक्झरी बस क्रमांक एम एच 19 वाय 3359 मध्ये भीषण अपघात झाला.
हा अपघात इतका मोठा होता की यात दूरपर्यंत आवाज जावून लक्झरी बस एका बाजूने चिरफाडली गेली. यात लक्झरी बस चालक- वाहक व प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. लक्झरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वावडदा गावातील गावकऱ्यांनी धाव घेत गंभीर जखमींना तात्काळ जळगाव कडील रुग्णालयाकडे रवाना केले आहे. या घटनेत सुमारे 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सदर लक्झरी बस त्यावरील चालक व मालक हे वडली गावातील असल्याची माहिती समोर येत आहे. तर या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली होती. जखमींवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.