Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    जळगाव

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 11, 2026Updated:May 11, 2026No Comments128 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगावातील दंगलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात रविवारी सामाजिक ऐक्य, राजकीय समावेशकता आणि विकासाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात वृक्षरोपण, वाचनालय उद्घाटन आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी वसीम खान यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

    आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते वसीम खान यांना नियुक्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम ज्या परिसरात झाला तो परिसर पूर्वी दंगलग्रस्त म्हणून चर्चेत होता. मात्र आता त्याच भागातून शांतता, शिक्षण आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमात बोलताना आमदार राजूमामा भोळे यांनी मोठी घोषणा करत दंगलग्रस्त कॉलनीला आता अब्दुल कलाम नगर म्हणून ओळख दिली जाईल, असे सांगितले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन या भागात शिक्षण, विकास आणि सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

    भाजप हा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. देशाच्या विकासात प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले. या घोषणेनंतर उपस्थित मुस्लिम बांधवांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. अनेकांनी जल्लोष करत भाजपच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. कार्यक्रमादरम्यान अनेक मुस्लिम युवकांनी आणि नागरिकांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. त्यामुळे आगामी स्थानिक राजकारणात या कार्यक्रमाची चर्चा रंगू लागली आहे. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर वसीम खान यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप सातत्याने काम करत आहे. पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत समाजहितासाठी अधिक वेगाने काम करू असे सांगितले.

    या उपक्रमामुळे जळगावात भाजप अल्पसंख्यांक मोर्चा सामाजिक सलोखा आणि विकासाच्या मुद्द्यावर अधिक सक्रिय होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक एकता या तीन मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून झालेल्या या कार्यक्रमाने परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif