मोकाट जनावरे रस्त्यावर अडथळा निर्माण करतील तर..
होणार कडक कारवाई : मुख्याधिकारी विवेक धांडे यांचा इशारा
शेंदुर्णी ता. जामनेर
शेंदुर्णी शहरातील सार्वजनिक रस्त्यावर मोकाट गुरे ढोरे उभी असतात यामुळे नागरिकांना तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे तसेच शहराच्या लगत असलेल्या शेतात सुद्धा ही मोकाट जनावरे घुसुन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नासधुस करुन नुकसान करत आहेत. तेव्हा ज्या नागरिकांच्या मालकीची गुरेढोरे सार्वजनिक रस्त्यावर तसेच शेतातील पिकांचे नुकसान करत असतील त्यांनी तात्काळ आपल्या स्वमालकीच्या गुराढोरांना हटवुन व्यवस्था करावी व खबरदारी घ्यावी असे आवाहन शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी केले आहे.
ज्या मालकांनी आपल्या स्वमालकीचे गुरेढोरे सार्वजनिक रस्त्यावरून न हटवल्यास शेंदुर्णी नगरपंचायत मार्फत मोकाट गुरांवर महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम २८५ व २८६ अन्वये कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना सांगितले आहे.