Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»इस्त्रायलच्या परमाणु ठिकाणांवर हल्ला करण्याची चेतावणी
    ब्रेकिंग

    इस्त्रायलच्या परमाणु ठिकाणांवर हल्ला करण्याची चेतावणी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 5, 2026Updated:March 5, 2026No Comments17 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अमेरिका इराण यांच्यातील तणावाच्या स्थितीमध्ये अनेक धक्कादायक निर्णय घेतले जात आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. इराणच्या प्रमुख शहरातील इमारतींना मोठे नुकसान पोहोचवण्यात आले. या युद्धात इराणच्या हातून बरेच काही जाताना दिसत आहे. लोक थेट रस्त्यावर उतरून अमेरिका आणि इस्त्रायलचा निषेध करत आहेत.

    इराणमध्ये मुलींच्या शाळेंवर मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाच शाळेतील 170 मुलींचा जीव गेला. यानंतर अमेरिकेने थेट भारताच्या विशाखापट्टनम येथून इराणच्या दिशेने रवाना झालेल्या इराणी युद्धनाैकेवर हल्ला केला. ज्यामध्ये 87 इराणी सैनिक मारले गेले. अमेरिकेने परमाणू चाचणी केल्याचाही दावा केला जात आहे. अनेक देशांनी या युद्धात तटस्थ भूमिका घेतली तर काही देश थेट अमेरिकेच्या बाजूने उभे आहेत. भारताकडून हे युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत.

    अमेरिकेसोबतच्या युद्धाला 100 तास पूर्ण झाल्यानंतर इराणकडून पहिल्यांदा मोठी धमकी देण्यात आली. थेट इस्त्रायलच्या परमाणू ठिकाणांवर हल्ला करण्याची चेतावणी इराणकडून देण्यात आली. इराणने आतापर्यंत 9 देशातील 13 अमेरिकन तळांवर हल्ला केला. यासोबतच अमेरिकन दूतावाला देखील हल्ल्यात टार्गेट केले जात आहे.

    इराणमधील मृतांचा आकडा 1,045 वर पोहोचला आहे. लेबनॉनमध्ये 60 हून अधिक आणि इस्रायलमध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात उतरल्यानंतर अमेरिकेलाही मोठ्या झळा बसत आहेत. अमेरिकेचे 6 सैनिक या युद्धात गेली. इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर शोकसभा आयोजित करण्यात येणार होती.

    मात्र, अमेरिकेने ज्याप्रकारे इराणी युद्धनाैकेवर हल्ला केला, त्यानंतर याला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या हल्ल्यांमुळे इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि ड्रोन तळांना मोठे झाले. मध्य पूर्वेत लाखो प्रवासी अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय शिपिंग पूर्णपणे कोलमडले आहे. यासोबतच अनेक देशांमध्ये फळे, भाजीपाल्याची अजिबात निर्यात किंवा आयात होत नाहीये.

    या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम हा थेट तेलाच्या किंमतींवर झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान पोहोचवू शकते. जगभरातील शेअर बाजार कोसळत आहेत. तेहरानमधील सरकारी टेलिव्हिजनने हल्ल्यात उद्ध्वस्त झाले. सरकारी इमारतींचे मोठे नुकसान झाले. अमेरिकेचे कोट्यावधीचे फायटर जेट पडली आहेत. इस्त्रायलमध्येही मोठे नुकसान झाले. फक्त इस्त्रायल आणि इराणच नाही तर अमेरिकेच्या लष्करी तळांचेही मोठे नुकसान झाले जे 9 देशात होते.

    #iran #protest America attack India Iranian Soldiers Israel Visakhapatnam
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

    April 15, 2026

    जळगाव मनपात 7 जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    April 15, 2026

    गावठी कट्टा, कोयत्यासह दोन तरुण अटकेत

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.