Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    जळगाव जिल्हा

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    लहान मुलांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 13, 2026No Comments72 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावाच्या युगात मुलांमध्ये संस्कार, अध्यात्म आणि भारतीय परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने श्री क्षेत्र लासूर ता. चोपडा येथे सद्गुरू संत तानाजी महाराज प्रासादिक निःशुल्क वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय कथाकार महंत प्रा. हभप डॉ. सुशिलजी महाराज विटनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हे निवासी शिबिर दि. २ मे ते ११ मे २०२६ दरम्यान उत्साहात संपन्न झाले.

    समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ लासूर यांच्या वतीने आयोजित या शिबिरामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला. शिबिरात श्रीमद्भगवद्गीता, हरिपाठ, रामरक्षा, विष्णुसहस्रनाम, हनुमान चालीसा यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे अध्ययन करण्यात आले. तसेच पखवाज वादन, गायन, कीर्तन प्रशिक्षण, वारकरी पावल्या यांचे प्रात्यक्षिक शिक्षण देण्यात आले. आधुनिक गरजांची सांगड घालत योगासने व व्यक्तिमत्त्व विकासावरही मार्गदर्शन करण्यात आले.

    शिबिरादरम्यान दररोज दुपारी विद्यार्थ्यांचे कीर्तन आयोजित करण्यात येत होते. तसेच रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत वारकरी परंपरेशी निगडित नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दि. २ रोजी हभप नरेश महाराज अंमळनेरकर, दि. ३ रोजी हभप हरीश महाराज वडगावकर, दि. ४ रोजी हभप बाळासाहेब महाराज अनवर्देकर, दि. ५ रोजी हभप पवन महाराज लासुरकर, दि. ६ रोजी हभप धीरज महाराज रुंधाटीकर, दि. ७ रोजी हभप गौरव महाराज वाळकीकर, दि. ८ रोजी हभप राहुल महाराज दोनगावकर, दि. ९ रोजी हभप सोहम महाराज लासुरकर, दि. १० रोजी हभप लक्ष्मण महाराज खेडीभोकरीकर यांची कीर्तने झाली. दि. ११ रोजी महंत प्रा. हभप डॉ. सुशिलजी महाराज विटनेरकर यांच्या काल्याच्या व परंपरेच्या गुलालाच्या कीर्तनाने शिबिराची सांगता झाली.

    शिबिराच्या समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, हे शिबिर दरवर्षी वेगवेगळ्या गावांमध्ये आयोजित करण्यात येते. शिबिरात ५ वर्षांवरील मुलांना प्रवेश देण्यात आला होता व वारकरी पोशाख बंधनकारक करण्यात आला होता. तसेच शिबिरादरम्यान मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अध्यात्मिक व सांस्कृतिक शिक्षण घेता आले.

    निवासी शिबिर असल्याने विद्यार्थ्यांनी आवश्यक साहित्य सोबत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, शिबिरातील विद्यार्थी गावातून मधुकरी मागून त्याच अन्नाचे सेवन करत होते. दरवर्षी सुमारे २०० विद्यार्थ्यांना या शिबिरातून आध्यात्मिक शिक्षण दिले जाते. लासूर येथील श्रीराम मंदिरात संपन्न झालेल्या या शिबिरासाठी राष्ट्रीय कथा प्रवक्ते महंत प्रा. हभप डॉ. सुशिलजी महाराज विटनेरकर यांच्या मार्गदर्शनासह सद्गुरू संत तानाजी महाराज प्रसादिक बालसंस्कार शिबिराचे अध्यापक, समस्त भजनी मंडळ व ग्रामस्थ लासूर यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. समाजात सुसंस्कारित व चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026

    उशिराने लग्न लागल्यामुळे वधू वर पक्षाला 2 हजारांचा दंड

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif