winx club bloom and stella gift of a friend hhgregg free delivery coupon free love coupon templates macys printable coupons for handbags
Friday, December 2, 2022

वरगव्हाण जि.प. शाळेत १७६ गरजवंत विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप

- Advertisement -

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पुणे येथील कात्रज भागातील बालाजी नगरमधील साई गारमेंटसच्या संचालिका, सामाजिक कार्यकर्त्या हेमलता देशपांडे यांनी सामाजिक दायित्व जपत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वरगव्हाण जिल्हा परिषद शाळेच्या १७६  गरजवंत विद्यार्थ्यांना रंगीत ड्रेस वाटप केले.

- Advertisement -

मुळचे वरगव्हाण येथील रहिवासी सध्या पुणे स्थित सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी इंद्रायणी महेंद्र पाटील (ग्रा.प.सदस्या) यांनी आपल्या गावातील गरिब निकडवंत विद्यार्थ्यांची  समस्या हेरुन दातृत्वशाली  हेमलता देशपांडे यांच्या माध्यमातून आज  दि.१४ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात १७६ विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप करण्यात आले.

- Advertisement -

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अडावद पोलिस ठाण्यात पोउनि किरण दांडगे यांनी भूषविले. यावेळी  महेंद्र पाटील, सरपंच भूषण पाटील, इंद्रायणी महेंद्र पाटील,जावेद बिस्मिल्ला तडवी (सदस्य), यास्मिन युनूस तडवी (सदस्या),नेमिचंद सोनार माजी सरपंच, गजानन निकम, हैदर तडवी, लतिफ तडवी, हाफिजा तडवी, मुज्जाक तडवी, सायराबाई पावरा (सदस्या), सपना पावरा (सदस्या), सतिष पाटील, सोनवणे मॅडम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षक राकेश पाटील व शरिफ तडवी यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका मंगला पाटील यांनी मानले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या