वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर !

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

काल (बुधवारी) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. त्यांनंतर काल दुपारी १२ वाजल्यापासून आज मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली. यामध्ये सत्ताधारी खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मते व्यक्त केली. तर विरोधकांनी याला जोरदार विरोध केल्याचे पाहायला मिळाले. तर आज मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. यावेळी विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर विरोधात २३२ मते पडली. दरम्यान वक्फ दुरूस्ती विधेयकावरील मतदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.

संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण ताकदीने त्याचे समर्थन केले. ते म्हणाले, माझ्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्याने मांडलेल्या विधेयकाचे मी समर्थन करतो. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी लक्षपूर्वक ऐकत आहे. मला वाटते की अनेक सदस्यांचे खरोखरच किंवा राजकीय कारणांमुळे अनेक गैरसमज आहेत. तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला होता. याचबरोबर बीडमधील कंकालेश्वर मंदिराची १२ एकर जमीन वक्फ बोर्डाने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) अरविंद सावंत आणि एमआयएमचे असुद्दिन ओवैसी यांनी वफ्क दुरूस्ती विधेयकावर जोरदार टीका केली.

वक्फ विधेयकात काय आहे ?

– ‘युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट,एफिशियंसी अँड डेवलपमेंट ऍक्ट’ असे नाव

– तरतुदी पूर्वलक्ष्यी प्रभावानं लागणार नाहीत

– सर्व्हे आयुक्तांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे

– वाद मिटेपर्यंत जमिनीचा ताबा सरकारकडे राहणार

– वादग्रस्त जमिनींचा फैसला जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा वरचा अधिकारी करेल

– वक्फ लवादामध्ये तीन सदस्य राहणार

– लवादावर जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष असतील

– सह सचिव दर्जाचा अधिकारी लवादाचा सदस्य असेल

– मुस्लिम कायद्यांचा जाणकार लवादाचा सदस्य असेल

– मुस्लिम सदस्यांपैकी दोन सदस्य महिला असतील

– परिषदेत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष,मुस्लिम कायद्याचे जाणकार मुस्लिम हवे

– परिषदेत मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी मुस्लिमच हवे

– सध्या सुन्नी आणि शिया समाजाचेच वक्फ बोर्ड

– नव्या सुधारणांनुसार आगाखानी आणि बोहरांसाठीही वक्फ बोर्ड

– वक्फचं ऑडिट कॅग किंवा तत्सम अधिकारी करणार

Leave A Reply

Your email address will not be published.