भडगाव तहसिलदारांची अवैध वाळू साठ्यावर धाड…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्याला वरदान असलेली गिरणा नदी जळगाव जिल्ह्यासह भडगाव तालुक्याची तहान भागवते. तसेच गिरणा पट्ट्यातील जमिनींना सुपीकता आणते. परंतु भडगाव शहरातील नगरपालिका पंपिंग हाऊस जवळ वॉटर सप्लाय विहिरी जवळून जे.सी.बि. च्या सहाय्याने अवैधरित्या वाळू चोरून ती वाळू भडगाव पेठ भागातील राजाराम बापू मेगा सिटी, पारोळा रस्त्यावरील जुना अंचाळगाव फाटा, पारोळा रस्त्यावरील नाला जवळ, जुना अंचळगाव रस्त्यावरील नगरपालिका डंपिंग ग्राउंड जवळ, अश्या विविध ठिकाणी अवैध वाळूचा साठा करून यामधून दररोज 20 ते 25 ढंपर वाळू धुळे, पारोळा, एरंडोल, तामसवाडी, येथे चढ्या भावाने टाकली जाते.

या बाबत भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, टोनगाव तलाठी राहुल पवार, भडगाव तलाठी अविनाश जंजाळे आणि त्यांच्या पथकाने या आठवडाभरात 55 ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करून शासन जमा केला आहे. तरी या अवैध वाळू बाबत तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी रात्री सर्रास चालणाऱ्या ढंपर वर सरळ हाताने कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.