वाल्मिक कराडला झटका.. सर्व मालमत्ता जप्त होणार?

0

बीड , लोकशाही न्यूज नेटवर्क 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण-हत्या प्रकरणाने सर्वत्र वातावरण तापले असताना मुख्य आरोपी वाल्मिक कराडला मोठा झटका बसला आहे.  वाल्मिक कराडच्या मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने दाखल केला आहे.

वाल्मिक कराड हजारो कोटींची संपत्ती जमवल्याचा आरोपी त्याच्यावर होत आहे. त्या अनुषंगाने तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील विविध भागांतील कराडच्या मालमत्तेची सर्व संभाव्य माहिती एकत्र केली जात आहे. या सर्वाचा त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील, अशी माहिती मिळत आहे. वाल्मिक कराडच्या नावावर बीडमध्ये अनेक जमिनी असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड येथील अलिशान सोसायट्यांमध्ये पत्नीच्या नावावर फ्लॅट असल्याचंही समोर आलं आहे. याशिवाय हडपसरमध्ये एका व्यावसायिक इमारतीत एक संपूर्ण माळा वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांना आरोप केला होता.

वाल्मिक कराडला बुधवारी कराड न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीड कारागृहात नेल्यानंतर कराडने पोटदुखीची तक्रार केली. यासंदर्भात कारागृह प्रशासनाने बुधवारी रात्री बीड सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र दिले. यानंतर कारागृहात डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी करून औषधे दिली. मात्र वेदना कमी होत नसल्याने बुधवारी रात्री कराडला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.