Tuesday, November 29, 2022

फर्दापूरमध्ये गुटखा व सुगंधित तंंबाखू वाहतूक करणारा आयशर जप्त

- Advertisement -

वाकोद ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

वाकोदपासून थोड्या अंतरावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व संगधित तंबाखू वाहतूक करणारा आयशर व्हॅन असा एकूण 52,15,200/- रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

06 मे रोजी फर्दापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे फर्दापुर हद्दीत जळगाव ते औरंगाबाद हायवे रोडने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व सुगंधित तंबाखु असे आयशर कंटेनरमध्ये चोरटी विक्री करण्यासाठी अवैध गुटखा, पान मसालाची वाहतुक केली जाणार आहे. अशी खात्रीलायक गोपनीय बातमी मिळाल्याने स.पो.नि. देवीदास वाघमोडे व त्यांचे पोलीस कर्मचारी पथकाने तात्काळ संध्याकाळी सात वाजता वाजेच्या दरम्यान जळगाव ते औरंगाबाद हायवे रोडवर हॉटेल कन्हैया कुंज जवळ पथकांनी सापळा रचला असता.

यावेळी मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांना समोरून एक आयशर कंटेनर वाहन येतांना कर्मचारी यानां दिसले. सदर वाहनाचे चालकास गाडी थांबवण्याचा इशारा देवुन वाहन थांबविले. चालकास विचारपुस करता वाहनचालक हा सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने पोलीसांचा संशय बळवला त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव हमीद हरुण खॉ (वय 35 वर्षे रा. नखरोला जि.पलवल हरियाणा) येथील असून सदर वाहन हे दिल्ली येथुन घेवुन सोलापुरकडे जात असल्याचे सांगितले.

आयशल वाहन क्रमांक एच.आर. 73ए-2236 यांचे सिल पंचासमक्ष तोडुन त्यांची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 29,95,200/- रुपये किंमतीचा प्रिमियम राज निवास पान मसालाच्या 78 गोण्या व 15 गोण्या प्रिमियम एक्स. एल. सुंगधीत तंबाखूच्या 7,20,000/- रुपये कि.अं. गोण्या मिळून आल्याने आयशर कंटेनर लाल रंगाचा किंजं. 15,0000/- अस एकूण 52,15,200/- रुपयांचा मुद्देमालहा पंचासमक्ष जप्त करण्यांत आला आहे.

यावरून पोलीस ठाणे फर्दापुर येथे गुरनं. 41/2022 कलम 188,273,328 भादंवी व कलम 59 अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 प्रमाणे दाखल करण्यात आला असुन वाहन चालक हमीद हरुण खॉ यास अटक करण्यात आली आहे. व पुढील तपास स.पो.नि. देवीदास वाघमोडे व करित आहेत. सदरची कामगिरी मा. मनीष कलवानिया, पोलीस अधिक्षक, मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विजयकुमार मराठे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सिल्लोडा यांचे मार्गदर्शनाखाली देविदास वाघमोडे, स.पो.नि. पोलीस अंमलदार सचिन काळे, योगेश कोळी प्रदिप बेदरकर यांनी केली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या