वाकोद सरपंच सरला सपकाळ यांचा भाजपमध्ये प्रवेश

0

वाकोद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सबका साथ सबका विकास “या मुल मंत्रावर चालणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेऊन, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन मी गावच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे वाकोद सरपंच सरलाताई सपकाळ यांनी सांगितले.

प्रतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे लोक इतर पक्षातून भाजपात पक्षप्रवेश करत आहेत. गाव- खेड्यातील कार्यकर्तेही यात मागे नाहीत. याचे कारण भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असल्याची ग्वाही ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथील पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने दिली. तालुक्यातील वाकोद येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरपंच सरलाताई सपकाळ यांनी नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर संजयदादा गरूड, गोविंद अग्रवाल, चंद्रकांत बाविस्कर, अमित देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.