पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मा राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच मतदान यादीत नाव असेल तर मतदानाचा हक्क बजावता येइल अशी माहिती पारोळा येथील निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार डॉ उल्हासराव देवरे यांनी माहिती देताना सांगितले.
दिनांक ६ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे व अंतिम मतदार यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.. मतदार यादीच्या कार्यक्रम बाबत महत्वाचा टप्पा म्हणून 25 जून ते 5 ऑगस्ट या दरम्यान सुसूत्रता कार्यक्रम राबविण्यात आला असून यात पारोळा तालुक्यात नवीन 08 केंद्र निर्माण केले आहेत. यात 016 एरंडोल मतदारसंघात सांगवी, म्हसवे, पारोळा शहर (न पा शाळा), वाघरे, मुंदाने( घा), करमाड खुर्द व 015 अंमळनेर मतदार संघात हिरापूर व शेलावे खुर्द यांचा समावेश करण्यात आला आहे.
सदर नवीन मतदान केंद्रामुळे पारोळा तालुक्यातील एरंडोल मतदार संघातील केंद्राची संख्या 123 वरून वाढून 129 वर गेली आहे व अमळनेर भागातील 42 गावातील 50 केंद्र ऐवजी 52 केंद्र अशी झाली आहे. (पारोळा तालुक्यातील एकूण केंद्र संख्या 181) सदर मतदार याद्या बीएलओ यांचे मार्फत प्रसिद्ध झाले असून यावर 20 ऑगस्ट पावेतो हरकत नोंदविता येणार आहेत व दि 20 ते 29 ऑगस्ट दरम्यान यावर निर्णय घेऊन अंतिम यादी 30 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सदर यादी विधान सभा मतदान साठी वापरली जाणार आहे तरी सर्व मतदार यांनी आपले नाव आजच्या मतदार यादीत आहे काय याची स्वतः खात्री करावी.. मतदार यादीत नाव असेल तरच आपणास मतदान करता येईल… जर यादीत नाव नसेल तर तात्काळ बीएलओ यांचे वतीने नमुना 6 भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे म्हणजे आपणास मतदान हक्काची बजावणी करता येईल.