Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    • नागपुरात न्यायाधीश अन् वकिलाच्या मुलाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»बोगस आधारकार्ड तयार करून मतदान केल्याचा गंभीर आरोप
    राजकारण

    बोगस आधारकार्ड तयार करून मतदान केल्याचा गंभीर आरोप

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 5, 2026No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बनावट आधारकार्ड वापरून मतदान केले जात असल्याचे गंभीर निरीक्षण भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी मतदार यादीतील बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित करत नोंदवले. मतदार, मृत मतदार, स्थलांतरित मतदार आणि घुसखोर मतदार यांच्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. घुसखोर व्यक्ती मोठ्या प्रमाणावर बनावट आधारकार्ड तयार करून मतदार यादीत आपली नावे समाविष्ट करत आहेत. या चुकीच्या पद्धतीने मतदार यादीत घुसलेल्या नावांना दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतलेले काम अत्यंत चांगले असल्याचे पडळकर यांनी म्हटले.

    भाजप आपल्या कार्यकर्त्यांना मतदार यादी शुद्धीकरणाविषयी सविस्तर प्रशिक्षण देत आहे. काही राज्यांमध्ये या मतदार याद्या शुद्ध झाल्या असून, लाखांच्या संख्येने मते कमी झाली आहेत. घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्या किंवा अन्य घुसखोरांचा मतदार यादीत समावेश होणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. अशा सर्व चुकीच्या मतदारांना दूर करणे आवश्यक आहे. अनेकदा मृत व्यक्तींची नावे तीस-तीस वर्षे यादीत असतात, किंवा दुबार मतदार दोन्ही ठिकाणी मतदान करतात. वीस-तीस वर्षांपासून पत्त्यावर नसतानाही मतदानाच्या दिवशी कोणीतरी बोगस आधारकार्ड वापरून मतदान करण्यास येते. हे मतदार यादी शुद्धीकरण लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत पवित्र काम आहे, असे पडळकर यांनी नमूद केले.

    Aadhaar Card Central Government Democracy fake Aadhaar card Gopichand Padalkar State government Voter List Voting
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.