नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरलाच ! 

0

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरलाच ! 

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश 

मुंबई प्रतिनिधी – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्रित जाहीर करण्याचा निर्णय देत दिला आहे.

निवडणूक आयोगाने सुरुवातीला २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर करण्याची तयारी केली होती. मात्र, आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन याचिकांमुळे २४ नगरपरिषद आणि १५४ सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या. आता या ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे दोन टप्प्यांत — २ डिसेंबर आणि २० डिसेंबर — होणाऱ्या मतदानानंतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार, आज झालेल्या मतदानाची मतमोजणीही २१ डिसेंबरलाच केली जाईल. त्या दिवशीच सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे विजेते जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच, २० डिसेंबरच्या मतदानानंतर अर्ध्या तासात एक्झिट पोल जाहीर करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.

या निर्णयामुळे मतदार, उमेदवार आणि प्रशासन यांच्या पुढील प्रक्रियेला स्पष्ट दिशा मिळाली असून निवडणूक आयोगाच्या कामकाजात स्पष्टता आल्याचे मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.