Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»मोठी बातमी : मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार
    राष्ट्रीय

    मोठी बातमी : मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 19, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    आधारकार्ड, पॅन कार्ड तसेच मतदार ओळखपत्र अत्यंत महत्वाची कागदपत्रे मानली जातात. पॅनकार्ड प्रमाणेच आता मतदार ओळखपत्र देखील आधारकार्डशी लिंक करावे लागणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने कार्यवाही  अधिक वेगाने सुरू केली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृह विभाग आणि यूआयडीएआय अधिकारी महत्वाची बैठक पार पडली. मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्यास या बैठकीत निवडणूक आयोगाने मंजुरी दिली.

    यासंदर्भात निवडणूक आयोगाने अधिकृत निवेदन दिले. यात म्हटले आहे की भारतीय संविधानातील अनुच्छेद 326 आणि लोकप्रतिनिधीत्व अधिनियमचे कलम 23(4), 23(5) आणि 23(6) नुसार ईपीआयस आधारकार्डशी जोडण्यात येणार आहे. याआधी केंद्र सरकारने पॅन कार्ड  आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक आयु्क्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह केंद्रीय गृहसचिव, एमईआयटीवायचे सचिव आणि यूआयडीएआयचे सीईओ आणि निवडणूक आयोगाचे तज्ज्ञ या बैठकीस उपस्थित होते.

    पुढील तीन महिन्यात डुप्लिकेट नंबर असणारे व्होटर आयडीला नवीन EPIC नंबर जारी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने नुकताच घेतला होता. डु्प्लिकेट नंबर असणे म्हणजे याचा अर्थ बनावट मतदार आहे असा होत नाही असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. आधारकार्ड मतदार ओळखपत्राशी जोडण्यामागे मुख्य उद्देश मतदार याद्यांतील गडबडी दूर करण्याचा होता. या निर्णयामुळे बनावट मतदार ओळखण्यास मदत होईल असे निवडणूक अधिकाऱ्यांना वाटते.

    सन 2021 मध्ये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मध्ये संशोधनानंतर आधारकार्डला व्होटर आयडी कार्डबरोबर लिंक करण्यास मंजुरी मिळाली होती. यानंतर 2022 मध्ये निवडणूक आयोगाने ऐच्छिक आधारावर मतदारांकडून आधार नंबर गोळा करण्यास सुरुवात केली. परंतु आयोगाने मतदार याद्यांच्या आपल्या संशोधनात आधार संख्येचा वापर अजून तरी केलेला नाही. मतदार याद्यांत मतदारांच्या बनावट नोंदी शोधून काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याचा निर्णय बंधनकारक केलेला नाही.

    पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांत मतदारांचे एकसारखेच ईपीआयसी नंबर असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. कोलकाता शहरात पक्षाच्या एका संमेलनात मु्ख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. निवडणूक आयोगाशी संधान साधून भाजपने मतदार याद्यांत हेरफेर केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता.

     

    Election Commission of India Voter ID to be linked with Aadhaar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी

    August 12, 2026

    वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!

    August 12, 2026

    आम्हाला शाहांचे भाषण ऐकण्यात काहीच स्वारस्य नाही

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif