Voice Of Dog या संस्थेतर्फे जळगावातील 150 पेक्षा जास्त भटके, पाळीव कुत्रे आणि मांजरीचे मोफत लसीकरण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

Voice Of Dog या प्राणीमित्र संघटनेतर्फे जळगाव शहरातील 150 पेक्षा जास्त प्राण्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले. यामध्ये मोकाट आणि पाळीव कुत्रे तसेच मांजरींचा ही समावेश होता. यासोबतच सर्व प्राण्यांची Deworming आणि आरोग्य तपासणी सुध्दा करण्यात आली.

संघटनेने रबिवलेल्या या मोफत शिबिरास जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. राठोड (वैजंती पेट केअर क्लिनिक) यांच्या मार्गर्शनाखाली शिबिर राबिविण्यात आले.

शिबिराच्या आयोजनासाठी Voice Of Dog संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यात शुभम चौधरी, तुषार चौधरी, हेमंत चौधरी, मोहित सेठीया, पवन सपकाळे, विशाल निंबाळकर, भुषण कांबळे, रोहित नाथजोगी, आदिती अडकमोल, स्नेहा सोनवणे, अमित हिरोले, सुमित सोनवणे, राहुल पवार, विवेक सुतार यांचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.