Sunday, May 29, 2022

Vodafone Idea ने आणला जबरदस्त प्लॅन; या मिळणार सेवा

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

Jioआणि Airtel ची चिंता वाढण्याचे संकेत आहेत, कारण Vodafone Idea एक जबरदस्त प्लॅन आणला आहे. Vodafone Idea तसेच गेल्या काही दिवसात अनेक नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. या नवीन प्लॅनच्या यादीमध्ये 337 रु, 107 आणि रु. 111 चे प्लान समाविष्ट आहेत. पण आता कंपनीने आपल्या यादीत दोन नवीन प्रीपेड योजनांचा समावेश केला आहे.

- Advertisement -

हे मिळणार फायदे

Vodafone Idea चा 137 रुपयांचा प्रीपेड प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानसह, युजर्सना व्हॉइस कॉलसाठी दहा ऑन-नेट मिनिटे मिळतील. याशिवाय सर्व कॉलसाठी युजर्सना 2.5 पैसे/सेकंद शुल्क आकारले जाईल. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नाईट कॉल मिनिटे उपलब्ध असतील. 1/1.5/5 आउटगोइंग एसएमएससाठी शुल्क आकारले जाईल.

कंपनीचे 141 चे व्हाउचर 31 दिवसांच्या वैधतेसह येते. या प्लानसह युजर्सना व्हॉईस कॉलसाठी 10 ऑन-नेट नाईट मिनिटे मिळतील. एसएमएसचे शुल्क 137 रुपयांच्या व्हाउचरसारखेच आहे. दोन्ही प्लानमधील फरक इतकाच आहे की 141 रुपयांचे व्हाउचर एका दिवसाच्या अतिरिक्त वैधतेसह येते. त्याशिवाय, दोन्ही योजना एकसारख्या आहेत.

कंपनीने 30 आणि 31 दिवसांच्या प्रीपेड योजनांची श्रेणी लाँच केली आहे आणि इतक्या नवीन मासिक वैधतेसह प्रीपेड योजना लाँच करणारी एकमेव कंपनी आहे. 107 आणि 111 रुपयांचे व्हाउचर देखील एक चांगला पर्याय आहे, परंतु या योजना युजर्सना एसएमएस पाठविण्याची परवानगी देत ​​​​नाहीत. 141 रुपये आणि 137 रुपयांच्या व्हाउचर्ससह, युजर्स एसएमएस पाठवू शकतात जरी त्यांच्याकडून त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात असेल.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या