Wednesday, May 25, 2022

यंदा कर्तव्यासाठी विवाहाचे तब्बल ८९ मुहूर्त

लोकशाही न्यूज नेटवर्क

चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरु झालेल्या नववर्षात यंदा विवाहाचे ८९ मुहूर्त असून शुद्ध ६२, तर आपत्कालीन असे २७ मुहूर्त काढण्यात आले आहेत. यासोबतच उपनयन मुंज संस्काराचे एकूण ४७ मुहूर्त असून २२ मुहूर्त हे शुद्ध शास्त्रीय तर २५ मुहूर्त हे आपत्कालीन आहेत. त्यामुळे २०२२ ते २०२३ या काळात बऱ्याच जणांचे कर्तव्य पार पडले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शुद्ध शास्त्रानुसार २०२२ दरम्यान योग्य विवाह मुहूर्त हे चैत्र ते आषाढ- १५, १७, २१, २४, २५ एप्रिल, ४, १०, १३, १४, १६, १८, २०, २१, २२, २५, २६, २७ मे, १, ६, ८, १०, १३, १४, १६, १८ जून, ३, ५, ६, ७, ८, ९ जुलै असे असणार आहेत. तर २०२२-२३ दरम्यान मार्गशीर्ष ते फाल्गुनमध्ये तुळशी विवाहानंतर २५, २६, २८, २९ नोव्हेंबर २, ४८, ९, १४, १६, १७, १८ डिसेंबर, १८, २६, २७, ३१,जानेवारी, ६, ७, १०, ११, १४, १६, २३, २४, २७, २८ फेब्रुवारी, ९, १३, १७, १८ मार्च असे असणार आहेत.

चातुर्मास आपत्कालीन विवाह मुहूर्त हे आषाढ ते कार्तिक २०२२ दरम्यान १४, १५, ३१ जुलै, ३, ४, ७, ९, १०, १५, १६, २०, २१, २९ ऑगस्ट , ७, ८,२७, ३० सप्टेंबर, ६, ९, १०, ११, २१, ३१ ऑक्टोबर, ५, ६,१०, १७ नोव्हेंबर.

गौणकाळात व चातुर्मास काळातील मुहूर्त २०२२- १, ४, १५, १८ जुलै, ३, ७, १४, १६, २९ ऑगस्ट, ६, २७, ३० सप्टेंबर, ५, ११, ३० ऑक्टोबर, ३, १४,२८ नोव्हेंबर, २, ४, २७ डिसेंबर, १, ९,१२ जानेवारी असे असणार आहेत.

उपनयन संस्कार मुख्य काळातील मुहूर्त २०२२-२३ दरम्यान ३, ६, ११, १३, २१ एप्रिल ५, ६, ११, १८, २० मे, १, ६, १६ जून, २६, २४ फेब्रुवारी, १,३, ९ मार्च या काळात असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या