Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»‘ईठा’वर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबाचा आक्षेप
    मनोरंजन

    ‘ईठा’वर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबाचा आक्षेप

    ऐतिहासिक तथ्यांची तोडफोड केल्याचा आरोप : बदल करा अन्यथा...
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 16, 2026No Comments151 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ या आगामी चित्रपटावर वाद निर्माण झाला आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐतिहासिक सत्याशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाई नारायणगावकर यांचे नातू धनंजय खुडे यांनी पत्रकार परिषद घेत चित्रपट निर्मात्यांवर गंभीर आरोप करत अनेक मागण्या मांडल्या.

    धनंजय खुडे यांनी सांगितले की, विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्याशी संबंधित चित्रपट तयार करताना त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा होणे आणि ऐतिहासिक नोंदींची पडताळणी करणे आवश्यक होते. मात्र, चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान कुटुंबीयांची कोणतीही परवानगी किंवा संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

    त्यांच्या मते, चित्रपटाच्या टीझरमध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनातील काही घटनांचे चुकीचे चित्रण करण्यात आले त्यामुळे त्यांच्या कार्याचा आणि इतिहासाचा विपर्यास होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे ऐतिहासिक सत्य बदलून दाखविणे हे केवळ कुटुंबीयांच्या भावना दुखावणारे नसून लोककलेच्या इतिहासालाही धक्का देणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    यावेळी त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्यावरही टीका केली. विठाबाई नारायणगावकर यांच्या चरित्रावर चित्रपट बनवताना संपूर्ण कुटुंबीयांची संमती घेणे आवश्यक होते, मात्र तसे करण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे चित्रपटातील वादग्रस्त बाबींचा फेरविचार करून ऐतिहासिक तथ्यांनुसार आवश्यक बदल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

    दरम्यान, चित्रपटात आवश्यक बदल करण्यात आले नाहीत, तर चित्रपट निर्माते आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यासोबतच राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा कुटुंबीयांनी दिल्याने ‘ईठा’ चित्रपटावरील वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif