Sunday, January 29, 2023

विश्वरुद्र फाउंडेशनतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार

- Advertisement -

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

विश्वरुद्र फाउंडेशनतर्फे (Vishwarudra Foundation) जामनेर (Jamner) येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जामनेर भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांतभाऊ पाटील तसेच प्रमुख पाहुणे, उपनगराध्यक्ष जामनेर नानाभाऊ बाविस्कर, माजी सभापती पंचायत समिती नवलभाऊ पाटील, पी.आय नंदुरबार
भगवान खंडू कोळी, आरोग्य अधिकारी म न पा जळगाव डॉ. विकास पाटील. समाजसेवक जळगाव पंकज नाले, शिक्षण अधिकारी जामनेर विजय सरडे, विश्वरूद्र फाउंडेशन संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्रिकांत मोरे, महाराष्ट्र राज्य महासचिव रविंद्र शिवदास सूर्यवंशी, ऋषिकेश जाधव, दीपक पाटील, अमेय कुलकर्णी, किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण जळगाव जिल्ह्यामधून 75 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कारचे मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमावेळी अनेक शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून संघटनेच्या कार्याविषयी कौतुक केले व आभार मानले.

- Advertisement -

कार्यक्रम संपन्न करण्यासाठी जामनेर तालुक्यातील तालुकाध्यक्ष मीरा राठोड, आशाताई पाटील, प्रेम कथा पांडे, उज्वला चौरे, भाग्यश्री लुंकड, रेखा जैन, ज्योती इंगळे, रेखापाळे, सुनीता सपकाळे, ज्योती इंगळे, संगिता पाटील, शोभा तायडे, निरंजना तायडे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा बागुल यांनी केले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे