Friday, August 12, 2022

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

गेल्या काही काळापासून देशभरात इस्लामिक जिहादी कट्टरता वाढत आहे. हिंदूवर योजनापुर्वक पद्धतशीर हल्ले होत आहेत. या वर्ष प्रतिपदा आणि प्रभू श्री रामाच्या प्रकट दिनानिमित्त श्री राम नवमीला आयोजित देशभरातील मिरवणुकांवर दगडफेक आणि हल्ले केले गेले. त्यामुळे अनेक ठिकाणी कर्फ्यू लावावा लागला आणि देशभरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हिंदू समाजाने धीराने व समजूतदारपणाने वर्तन केल्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही. त्यानंतर काही ठिकाणी श्री हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवरही दगडफेक झाली. हिंदू समाजाला आपल्या देशात आपल्या देवतांची मिरवणूक काढता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिजाबच्या वादातूनही कर्नाटकात बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षची निर्घुण हत्या करण्यात आली होती. त्यावेळीही अनेक ठिकाणी हिंदूवर हल्ले झाले होते.

- Advertisement -

- Advertisement -

नुकतेच भगिनी नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्यावरून गेल्या दोन शुक्रवारी जुम्म्याच्या नमाजानंतर मशिदींमधून हल्ले करण्यात आले. हिंदूंची घरे, दुकाने आणि वाहने जाळण्यात आली. सरकारी मालमत्ता आणि मंदिरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिस दलांवरही हल्ले झाले, अनेकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या जिहादींनी कायद्याला चेष्टेचा विषय बनवला आहे. बंगाल, केरळ सारख्या राज्यांची सरकारे या इस्लामिक जिहादींच्या पाठीशी उभी असलेली दिसतात. तर हिंदू मानबिंदू असलेल्या देवी-देवतांबद्दल अनेक धर्मांकडून अनिर्बंध वाईट व असहनीय प्रचार केला जात आहे. जातीय द्वेष पसरवणारी वक्तव्ये दिली जात आहेत, तरीही देशातील अनेक धर्मनिरपेक्ष पक्ष गप्प आहेत.

लोकशाही धोक्यात आल्याचा गवगवा करणारे अनेक राजकीय पक्ष गेल्या दोन शुक्रवारी झालेल्या लोकशाहीच्या खुनावर मौन बाळगून आहेत. यांच्या मौन राहण्यामुळे देशातील सामाजिक सद्भाव बिघडतो आहे व यामुळे जिहादींचा उत्साह अधिक वाढतो आहे.

या हल्ल्यांमुळे संपूर्ण देशातील हिंदू समाज दुखावला आहे आणि संतप्तही आहे. देशभरातील हिंदू समाज या धरणे आणि निवेदनाद्वारे या घटनांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहे आणि तुमच्याकडे मागणी करतो की,

१) शेवटच्या दोन जुम्माच्या नमाजानंतर मशिदीतून बाहेर पडलेल्या उन्मादी जमावाची आणि दंगलखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. १७ जून रोजी या मशिदीसह इतर मशिदींवर जागरुकता ठेवावी. मुल्ला / मौलवी किंवा इतर कोणालाही जिहादी भाषणे देण्यापासून ताबडतोब थांबवावे.

२) मुल्ला / मौलवी / इतर मुस्लिम धर्मनिरपेक्ष नेते जे त्यांना भडकावतात त्यांची ओळख त्यांच्यावर रासुका लावून जिल्हा बदरची कारवाई करावी.

3) देशभरात अशी विचारी भाषणे देणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करावी.

४) ज्यांना धमकावले जात आहे त्यांना सुरक्षा पुरवावी आणि धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

५) ज्या मशिदी मदरसे यातून उन्मादी जमाव बहर पडला त्याची N.I.A. कडून चौकशी करावी.

६) इस्लामिक जिहादी धर्मांधता पसरवून देशात हिंसाचार पसरवणान्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि तबलिगी जमात यांसारख्या कट्टरपंथी संघटनांवर तात्काळ बंदी घालावी.

७) ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक झाले आहेत, तेथे त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी आणि पोलीस चौकी सक्तीने स्थापन करण्यात यावी आणि येथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा व अधिकार देण्यात यावेत.

भारतीय हिंदू समाजाची आपणाकडून अशी अपेक्षा आहे की, वरील मागण्यांबाबत आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन सरकारने कठोर कारवाई करावी यासाठी कार्यवाहीचे आदेश देण्यात यावे या मागणीसाठी हिंदू परिषद जळगाव जिल्हाधिकारी बाहेर  हनुमान चालीसा म्हणत निदर्शने केली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या