विराट कोहली ने सुर्याकुमार यादवला म्हटले असं काही…

0

 

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सूर्यकुमार यादवच्या 49 चेंडूत 103 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध टी-20 सामन्यात 5 विकेट गमावत 218 धावांची मोठी धावसंख्या उभारली. सूर्यकुमारने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर अल्झारी जोसेफविरुद्ध षटकार ठोकून आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत मैदानावर 11 चौकार आणि 6 षटकार मारले. सूर्यकुमार यादवची ही खेळी पाहून विराट कोहली यावर आपली प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहू शकला नाही. कोहलीने इंस्टा स्टोरीवर सूर्याचा फोटो शेअर केला आणि मराठीत कॅप्शन लिहिले, ‘तुला मानला भाऊ… सूर्यकुमारच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 218 धावा केल्या. मात्र, नंतर राशिद खानने 32 चेंडूत 79 धावा करत चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले.

5ncdqh2g

‘मिस्टर 360 डिग्री’ या फलंदाजाने विष्णू विनोद (20 चेंडूत 30) सोबत चौथ्या विकेटसाठी 42 चेंडूत 62 धावांची भागीदारी केल्यानंतर या काळात दोन अर्धशतकांची भागीदारी केली. सहाव्या विकेटसाठी त्याने कॅमेरून ग्रीनसोबत 18 चेंडूत 54 धावांची अभेद्य भागीदारी केली. यात ग्रीनचे योगदान तीन चेंडूत अवघ्या तीन धावांचे होते. इशान किशन (20 चेंडूत 31 धावा), रोहित शर्मा (18 चेंडूत 29 धावा) आणि विष्णू यांनीही संघाला चांगले योगदान दिले.

दरम्यान गुजरातकडून राशिद खानने चार षटकांत 30 धावा देत चार बळी घेतले. मोहित शर्माला एक विकेट मिळाली. मोहम्मद शमीने चार षटकांत ५३ धावा आणि अल्झारी जोसेफने चार षटकांत ५२ धावा दिल्या.

सेहवागही झाला आश्चर्यचकित

सूर्याच्या या खेळीने वीरेंद्र सेहवागलाही चकित केले. सेहवागने ट्विट करून लिहिले, ’17व्या षटकाच्या शेवटी 53 नाबाद आणि 20व्या षटकापर्यंत नाबाद 103. अप्रतिम सूर्यकुमार यादव, अप्रतिम फलंदाजी..’

Leave A Reply

Your email address will not be published.