21 व्या मजल्यावरुन पडून बाळाचा करुण अंत

पाय घसरला अन् घात झाला, सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विरारमधून मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. विरारमध्ये एका सात महिन्याच्या बाळाचा २१ व्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पश्चिम येथील बोळींज भागातील जॉय विले टाऊनशिपमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

 

७ वर्षांनंतर बाळ झाले

मिळालेल्या माहितीनुसार, विरारमधील बोळींज भागात जॉय विले टाऊनशीप प्रोजेक्ट आहे. या टाऊनशीप प्रोजेक्टमधील पिनॅकल इमारतीत विकी सदाने आणि पूजा सदाने हे दांपत्य 21 व्या मजल्यावरील २१०४ या फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाळ झाले होते. त्या बाळाला नुकतंच सात महिने पूर्ण झाले होते. बुधवारी (२३ एप्रिल) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पूजा सदाने या बाळाला खांद्यावर घेऊन खिडकी बंद करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी खिडकीजवळ सांडलेल्या पाण्यामुळे त्यांचा पाय घसरला. त्यानंतर त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या खांद्यावर असलेले बाळ २१ व्या मजल्यावरुन खाली पडले. त्याचा बाळाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे सदाने दांपत्याला ७ वर्षांनंतर बाळ झाले होते. मंगळवारी बाळाला ७ महिने पूर्ण झाले होते.

 

खिडकी बंद करताना

या घटनेच्या वेळी बाळाचे वडील विकी सदाने कामावर गेले होते. काही नातेवाईक घरी बाळाला भेटण्यासाठी आले होते. बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा सदाने खिडकी बंद करत असताना हा अपघात घडला. त्यांच्या घराच्या खिडकीला पूर्णपणे जाळी नव्हती. या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर सदाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.