Viral Video: मोबाइलमध्ये व्यस्त तरुण आणि बिबट्याचा थरारक हल्ला

'तरी बरं मोबाइलवर खेळत होता.. अन्यथा त्याचाच खेळ झाला असता' ! (पहा व्हिडीओ )

0

Viral Video: मोबाइलमध्ये व्यस्त तरुण आणि बिबट्याचा थरारक हल्ला!

‘तरी बरं मोबाइलवर खेळत होता.. अन्यथा त्याचाच खेळ झाला असता’ ! (पहा व्हिडीओ )

बिबट्या दबक्या पावलाने आला आणि झोपलेल्या कुत्र्यालाच उचलून नेला .. !

 

सध्या सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, जंगलातील हिंस्र प्राणी आता शहरी भागातही दिसू लागले आहेत, याची जाणीव त्यातून होते.

व्हिडीओमध्ये एक तरुण पलंगावर झोपून मोबाइलमध्ये रील्स पाहण्यात मग्न असतो. त्याचवेळी एका बाजूला एक श्वान शांतपणे झोपलेला असतो. अचानक समोरून एक बिबट्या दबक्या पावलांनी आत प्रवेश करतो. त्याची नजर श्वानावर पडताच तो सावध गतीने पुढे सरसावतो आणि क्षणात त्या श्वानाला आपल्या जबड्यात पकडून पळून जातो.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तरुणाच्या सतर्कतेच्या अभावावर टीका केली, तर काहींनी बिबट्याच्या वाढत्या संचाराबाबत चिंता व्यक्त केली.

तरुण मोबाइलमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याला या धोक्याची अजिबात जाणीव नव्हती. मात्र, जेव्हा त्याने बिबट्याला पाहिले, तेव्हा तो घाबरून घरात पळाला. मात्र, या घाईत त्याने श्वानाला वाऱ्यावर सोडले. सुदैवाने श्वान बिबट्याच्या तावडीतून सुटला आणि घराकडे धावत सुटला.

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी त्या तरुणाला ट्रोल करत लिहिले, “तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाला, पण बिचाऱ्या श्वानाला वाचवले नाही!” तर काहींनी “मोबाइलमध्येच व्यस्त राहिल्यास असेच प्रसंग समोर येतील,” असा इशारा दिला.

या घटनेने पुन्हा एकदा प्राण्यांच्या वाढत्या संचाराचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा घटनांपासून सतर्क राहण्याची गरज आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.