Thursday, February 2, 2023

बापरे ! कोर्टात महिला वकिलांमध्ये तुफान हाणामारी (व्हिडीओ)

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही तर मजेशीर तर काही हाणामारीचे. असाच एक हाणामारीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. अनेक भांडणतंटे हे कोर्टात (Court) सोडवले जातात. पण याच कोर्टात जर वकिलांची हाणामारी झाली तर तुम्हाला धक्का बसेल.

सध्या सोशल मीडियावर दोन महिला वकिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान (Viral Video) व्हायरल होतोय. यामध्ये दोन महिला वकीलच एकमेकींना तुफान मारहाण करताना दिसून येत आहे. ही मारामारी चक्क कोर्ट परिसरातच झालीय.

- Advertisement -

काय आहे व्हिडिओमध्ये ?

या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन महिला वकिलाच्या ड्रेसमध्ये आहेत. त्या एकमेकींना लाथा बुक्क्यांनी (Women Fight) मारहाण करत आहेत. इतकंच नाही तर, त्या एकमेकींच्या झिंज्या देखील उपटत आहेत. या महिलांना भांडताना बघून तेथे उपस्थित असलेले इतर वकील त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

मात्र, तरी सुद्धा या दोन्ही महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. दोघींपैकी एकही मागे हटायला तयार नाही. कुणी मध्यस्थी केली की थोडा वेळ शांत बसतात पण लगेच एकमेकींवर तुटून पडतात. आजूबाजूच्या लोकांनासुद्धा या महिलांना आवरणे अवघड झाले आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील असल्याचं सांगितलं जातंय. येथील कासगंज जिल्हा सत्र न्यायालयाच्या फॅमिली कोर्टाबाहेर ही हाणामारी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला वकील आपाआपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी कोर्टात आल्या होत्या. त्यावेळी काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे