लोकशाही न्यूज नेटवर्क
पक्ष्यांचा एक थवा रहस्यमयपणे आकाशातून अचानकपणे पडला, त्यापैकी बरेच पक्षी खाली फुटपाथवर कोसळले आणि मरण पावले. ७ फेब्रुवारीचा हा विचित्र घटनेचा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शेकडो पिवळ्या डोक्याचे काळे पक्षी दिसून येत आहेत.
स्थानिक न्यूज आउटलेट एल हेराल्डो डी चिहुआहुआच्या मते, मेक्सिकोमधील चिहुआहुआ येथील रहिवाशांनी फुटपाथवर मृत पक्षी आढळल्यावर पोलिसांना कळवले. अल्वारो ओब्रेगॉनच्या विभागीय पोलिसांनी सांगितले की त्यांना सोमवारी सकाळी ८.२० च्या सुमारास मृत पक्ष्यांचे फोन येऊ लागले.
Hundreds of birds mysteriously plummet to their deaths in Chihuahua, Mexico. https://t.co/j0JyP6ZcnM
— Ian Miles Cheong (@stillgray) February 12, 2022
सुरक्षा कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये मोठ्या काळ्या भोवर्यात पक्ष्यांचा थवा घरावर पडताना दिसला. तर काही काळे पक्षी उडण्यात यशस्वी झाले आणि अनेकांचा मृत्यू झाला. व्हिडीओमध्ये पक्षी रस्त्यावर निर्जीव पडलेले दिसत आहेत.
हा व्हिडीओ ट्विटरवर १.५ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले आहे. पक्षी रहस्यमयपणे आकाशातून का पडले हे स्थानिक अधिकारी त्वरित स्पष्ट करू शकले नाहीत.
यूएसए टुडेच्या मते, एका पशुवैद्यकाने असे सिद्ध केले की पक्षी एकतर विषारी धूर त्यांच्या शरीरात गेला असेल किंवा हीटरमधून किंवा विजेच्या तारांवर बसताना त्यांना विजेचा धक्का बसला असेल. सोशल मीडियावर काही लोकांनी असाही अंदाज लावला की हे रहस्यमय मृत्यूचे कारण ५G असू शकते.